मुंबई - Animal movie :अभिनेता रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटानं चार दिवसांत जबरदस्त कमाई करून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'अॅनिमल' हा या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटांचे शो सातत्यानं हाऊसफुल्ल होत आहेत. हा चित्रपट हिट होण्याचे श्रेय रणबीर कपूरच्या अभिनयाला आणि त्याच्या लुक्सला जाते. या चित्रपटात रणबीरनं लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक रुपेरी पडद्यावर चाहत्यांना दाखवला आहे.
'अॅनिमल' चित्रपटासाठी केलं ट्रान्सफॉर्मेशन : रणबीरनं आपल्या अभिनयासोबतचं त्याच्या बॉडीवर देखील काम केलं आहे. रणबीरच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसापूर्वी रणबीरचा 'तू झुठी मैं मकर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो सडपातळ होता. मात्र तो 'अॅनिमल'मध्ये खूपच दणकट दिसत आहे. काही दिवसांतच रणबीरचे हे अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रणबीर कपूरनं त्याची बॉडी 'अॅनिमल'साठी कशी तयार केली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल व्यतिरिक्त अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे.