महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor Six-pack abs : तू झुठी मैं मक्कारच्या सिक्स-पॅक अ‍ॅब्ससाठी रणबीरने केलेल्या कष्टाचा ट्रेनरने केला खुलासा - रणबीरचा आगामी चित्रपट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा फिटनेस ट्रेनर शिवोहमने त्याच्या इंस्टाग्रामवर दोन शर्टलेस फोटो शेअर केले आहे. शिवोहमने लूक मिळवण्यासाठी कठोर शिस्त आणि समर्पण केल्याबद्दल आरकेचे कौतुक केले.

सिक्स-पॅक अ‍ॅब्ससाठी रणबीर
सिक्स-पॅक अ‍ॅब्ससाठी रणबीर

By

Published : Mar 11, 2023, 4:08 PM IST

मुंबई- दिग्दर्शक लव रंजनचा तू झुठी मैं मक्कार ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने देशातील रोम-कॉम चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग नोंदवली. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करत आहेत. या चित्रपटात रणबीर अनेक दृश्यांमध्ये त्याचे सिक्स-पॅक अ‍ॅब्स दाखवण्यासाठी शर्टलेस झाला. अभिनेत्याचा फिटनेस ट्रेनर शिवोहमने आता तो लूक मिळविण्यासाठी अभिनेता रणबीरने कसे कठोर प्रशिक्षण कसे घेतले याबद्दल खुलासा केला आहे.

इंस्टाग्रामवर रणबीरच्या फिटनेस ट्रेनरने अभिनेत्याचे दोन शर्टलेस फोटो पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये, शिवोहमने लूक मिळविण्यासाठी कठोर शिस्त आणि समर्पण केल्याबद्दल अभिनेता रणबीरचे कौतुक केले. शिवोहमने सांगितले की रणबीरचा लूक समर्पित, शिस्तबद्ध जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे. तो म्हणाला की हा एक सांघिक प्रयत्न असल्याने, अर्धवट मनाने सहभागी होणे आणि इतके चांगले परिणाम मिळवणे अशक्य आहे. ध्येय गाठण्याचे आणि स्पर्धेतून बाहेर पडण्याचे पहिले कारण म्हणजे जागृत होण्याची आणि आवश्यक ते मनलावून करण्याची इच्छा, असे तो म्हणाला.

फिटनेस ट्रेनरने रणबीरचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सांभाळल्याबद्दल त्याचे कौतुक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणबीर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट यांनी राहा या मुलीचे स्वागत केले. शिवोहम पुढे म्हणाला की त्याला रणबीरचा अभिमान आहे की त्याने त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन या दोन्हीचा चांगला बॅलन्स साधला. तो म्हणाले की या सर्व गोष्टी पुस्तके वाचून शिकता येत नाहीत, परंतु त्याऐवजी त्या तुमच्यामध्ये रुजलेल्या विश्वास आहेत आणि तुम्ही तुमच्या पालकांकडून आणि तुम्ही जपलेल्या संगतीतील लोकांकडून घेत असता.

भारतात पहिल्याच दिवशी तू झुठी मैं मक्कारने 15.73 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. रणबीरचा आगामी चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शत अ‍ॅनिमल हा आहे आहे. या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -Rocket Boys 2 Screening : रॉकेट बॉईज 2 स्क्रीनिंगला सबा आझादसोबत हृतिक रोशनची हजेरी, नेटिझन्स म्हणाले 'कंगना वाइब्स आ रही है'

ABOUT THE AUTHOR

...view details