मुंबई - Ranbir kapoor : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बी-टाऊनची लोकप्रिय जोडी आहे. या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी खूप खास केमिस्ट्री पाहायला मिळते. अलीकडेच आलियानं दिलेल्या एका वक्तव्यामुळं रणबीर हा ट्रोल झाला होता. आलिया भट्टनं एका आठवड्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिनं सांगितलं होतं की, पती रणबीरला तिचं लिपस्टिक लावणं आवडत नाही. जेव्हा ती लिपस्टिक लावते, तेव्हा रणबीर तिला पुसण्यास सांगते. रणबीरबद्दलचा हा खुलासा झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळी उडाली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण त्याला ट्रोल करू लागले होते.
रणबीर कपूरनं दिली प्रतिक्रिया : लोकांनी रणबीरला ही अट आलियावर लादल्याबद्दल सुनावले होत. रणबीरनं अखेर या प्रकरणावर आपलं मौन तोडलं असून तो पुन्हा एकदा या वक्तव्यानं चर्चेत आला आहे. रणबीर कपूरला आलियाच्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो, यामुळे त्याला अनेकजणांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. रणबीर आलियाशी कठोर वागत असल्याचा आरोप ट्रोल्सनं केला होता. आता रणबीरनं या मुद्द्यावर आपले मौन तोडत म्हटलं, विकृत पुरुषाच्या वृत्तीच्या विरोधात लढणाऱ्यांच्या बाजूनं तो आहे. त्यानं म्हटलं, 'कधीकधी एक अभिनेता म्हणून तुमच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात, अनेक मते तयार होतात, जी खरी असतीलच असे नाही. माझी ही प्रतिमा, जी चित्रपटातून किंवा मी साकारलेली पात्रे आणि माध्यमांतून निर्माण झाली आहे, ती माझी स्वतःची नाही. मी तसा नाही. ही प्रतिमा सार्वजनिक आहे. याचे मालक लोक आहेत. मी एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकतो. एक अभिनेता आणि माझे लक्ष नेहमीच अभिनयावर असते.