महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Oppenheimer : 'ओपेनहायमर'च्या शोला बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी, कपूर-धवन चौकडीने पाहिला सिनेमा - बॉलिवूड

हॉलिवूड चित्रपट 'ओपेनहायमर' पाहण्यासाठी काल रात्री रणबीर कपूर आणि अर्जुन कपूरसह धवन बंधू एकत्र आले होते. या दोघांना पापाराझीने यावेळी स्पॉट केले.

Oppenheimer
ओपेनहायमर

By

Published : Jul 22, 2023, 2:47 PM IST

Updated : Jul 22, 2023, 3:09 PM IST

मुंबई : 'ओपेनहाइमर' या हॉलिवूड चित्रपटाची जादु बॉक्स ऑफिसवर चालली आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी भारतात आणि जगभरातील देशांमध्ये प्रदर्शित झाला. 'ओपेनहाइमर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशात आणि जगात उत्तम कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी खूप प्रेक्षक गर्दी करत असून या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर आले एकत्र :सध्या भारतात 'ओपेनहायमर'ची क्रेझ खूप वाढत आहे. तसेच भारतीय प्रेक्षक हा चित्रपट खूप एन्जॉय करत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी सामान्य प्रेक्षकांसह बॉलिवूड स्टारसनाही थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा मोह टाळता आला नाही. काल रात्री रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रोहित धवन हे तिघे बांद्रा येथील थिएटरमध्ये 'ओपेनहायमर' चित्रपट पाहण्यासाठी एकत्र आले होते. चित्रपट पाहून येतानाचा त्यांचा व्हिडिओ हा पापाराझीने कॅमेरात कैद केला. या तिन्ही स्टार्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओला चाहते फार लाईक करत आहेत.

रणबीर कपूर आणि अर्जुन कपूरचा झाला व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओमध्ये अर्जुन आणि रणबीर काळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत होते. त्याचबरोबर वरुण धवन व दिग्दर्शक रोहित धवन देखील रणबीर आणि अर्जुनसोबत होते. चित्रपट पाहण्यापूर्वी चौघांनी जेवण एकत्र केले आणि त्यानंतर यांनी चित्रपट पाहिला. आता थिएटरमधील या तीन स्टार्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 'इंस्टेलर' आणि 'डंकर्क' सारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी 'ओपनहायमर'चे दिग्दर्शन केले आहेत. हा चित्रपट ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ त्यांच्या योगदानावर आधारित आहे. ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांना अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखले जाते. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील त्यांच्या योगदानावर आधारित आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते . ही पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा अणुबॉम्बच्या स्फोटाने संपूर्ण जग हादरले होते.

हेही वाचा :

  1. Oppenheimer box office :'ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'चा भारतात पहिल्या दिवशी धमाका
  2. Allu Arjun : 'इथं फक्त एकाचेच राज्य चालते, पुष्पाचे राज्य', अल्लू अर्जुननेच लीक केला 'पुष्पा २'चा डायलॉग
  3. Shiney Ahuja Passport Application: जामिनावर असलेला बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा निघाला परदेशी; पासपोर्टसाठी उच्च न्यायालयात धाव
Last Updated : Jul 22, 2023, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details