मुंबई :रणबीर कपूर, आणि रश्मिका मंदान्ना स्टारर अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'अॅनिमल' बाबत निर्मात्यांमध्ये संभ्रम होत आहे. 2 जुलै रोजी 'अॅनिमल' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी कोणताही धोका न पत्करता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आणि आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'अॅनिमल'ला नवीन रिलीज डेट मिळाली आहे. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहे.
आता अॅनिमल कधी प्रदर्शित होणार ? : अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी आता या चित्रपटाशी कोणताही खेळ न करता चित्रपटाची रिलीज डेट 1 डिसेंबर 2023 अशी केली आहे. हा चित्रपट आता हिवाळ्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, अॅनिमल चित्रपटाची समस्या अद्याप संपलेली नाही, कारण 1 डिसेंबर 2023 रोजी एक मोठा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. रणबीरच्या या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर कधी प्रदर्शित होणार यासाठी प्रेक्षक फार आतुरेने वाट पाहत होते. मात्र चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे.