मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाह पार पडला आहे. रिपोर्टनुसार दोघांनी सात फेरे घेतले आहेत. आता ही जोडी अधिकृतरित्या पती पत्नी बनले आहेत. या विवाह सोहळ्याला दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. बुधवारपासून या विवाहाची चर्चा सर्व माध्यामावर सुरू आहे. हे लग्न मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्यात मॅरेज इव्हेन्ट कंपनीला यश मिळाले आहे.
अखेर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा पार पडला विवाह - रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा पार पडला विवाह
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाह पार पडला आहे. रिपोर्टनुसार दोघांनी सात फेरे घेतले आहेत. आता ही जोडी अधिकृतरित्या पती पत्नी बनले आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाह
या सोहळ्याला जे सेलेब्रिटी हजर होते, त्यांचे केवळ वास्तु या आलियाच्या निवासस्थानाबाहेरचे फोटो व व्हिडिओ प्रसार माध्यमांना मिळू शकले आहेत. अद्यापही आलिया आणि रणबीरच्यावतीने पार पडलेल्या विवाहाचे फोटो शेअर करण्यात आलेले नाहीत.
हेही वाचा -लग्नानंतर आलिया भट्टच्या सांगण्यावरुन सर्वप्रथम रणबीर करणार हे काम
Last Updated : Apr 14, 2022, 7:44 PM IST