मुंबई:अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) आणि आलिया भट्टच्या ( Alia Bhatt ) लग्नाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि आई नीतू कपूर यांनी या जोडप्याच्या मेहंदी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर, मीडियाशी बोलताना लग्नाच्या तारखेबद्दल माहिती दिली आहे.
रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने दिलेल्या ( Ranbir's sister Riddhima Kapoor ) माहितीनुसार, लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी बैसाखीच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार आहेत. रिद्धिमा कपूर म्हणाली, "उद्या (गुरुवारी) रणबीरच्या वांद्रे येथील निवासस्थानी लग्न आहे." ही माहिती देताना रिद्धिमा आणि नीतू, त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा सोहळा ( Ranbir-Alia's wedding ceremony ) अखेर आजपासून सुरू झाला आहे. रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आत्या रिमा जैन (दिवंगत ऋषी कपूर यांची बहीण) आणि चुलत बहीण निताशा नंदा (रितू आणि राजन नंदा यांची मुलगी) हे विवाहासाठी आले होते. वांद्रे येथील रणबीरच्या निवासस्थानी येताना कुटुंबातील सदस्य आणि मित्र पारंपारिक पोशाखात दिसत होते.