मुंबई -बॉलिवूडमधील बहुचर्चित रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे अखेर शुभमंगल झाले. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, कॅटरिना कैफ-विकी कौशल सारख्या बॉलिवूडच्या पॉवर कपल्समध्ये त्यांची भरती झाली आहे. इथे नमूद करावेसे वाटते ते म्हणजे वरील दोन जोड्यांमधील दीपिका आणि कॅटरीना वेगवेगळ्या काळी रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंड्स होत्या.
फोटो सौजन्य - वीरेंद्र टी चव्हाण इन्स्टाग्राम अनेक सेलिब्रिटी आणि इतर चाहत्यांनी नवविवाहित जोडप्याचे मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. मुंबईतील या शाही लग्नसोहळ्याबरोबरच रणबीर आलियाचे कोलकाता मध्ये सुद्धा लग्न झाले हे तुम्हाला माहित आहे का? हो, ते खरं आहे परंतु त्यात ट्विस्ट आहे.
फोटो सौजन्य - वीरेंद्र टी चव्हाण इन्स्टाग्राम रणबीर कपूर आणि आलिया भटचे देश विदेशात अनेक चाहते आहेत. या दोघांच्या चाहत्यांनी कोलकातामध्ये या दोघांचे लग्न लावले. अर्थातच रणबीर आणि आलीय दोघे मुंबईत सात फेरे घेत असताना त्यांचे बंगाली पद्धतीने लग्न लावण्यात आले, त्यांच्या बंगाली चाहत्यांकडून. त्यांनी पारंपारिक बंगाली लग्नाचे पोशाख घातलेल्या दोन मुर्त्या बनविल्या आणि पुरुषाच्या पोशाखातील मूर्तीवर रणबीर कपूरचा मुखवटा चढविला तर बाईच्या मूर्तीवर आलियाचा. त्यानंतर बंगाली पारंपरिक पद्धतीने लग्नाचे विधी पार पाडले. रणबीर-आलियाच्या चाहत्यांनी अनोख्या शैलीत त्यांचे मिलन साजरे केले.
हेही वाचा -रणबीर आलियाच्या लग्नाचे भन्नाट, व्यंग दाखवणारी मिश्कील मीम्स