महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर-आलिया विवाह : करिश्मा, करीनासह दिग्गज वऱ्हाडींचे आगमन - आलिया रणबीरची बातमी

बॉलिवूड पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सोहळ्यासाठी सेलेब्रिटींनी हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. रणबीरची चुलत बहीण करिश्मा कपूर, करीना कपूर खान, नताशा नंदा आणि आत्या रीमा जैन हे रणबीरच्या मुंबईतील वांद्रे येथील वास्तू निवासस्थानी पोहोचले आहेत.

रणबीर-आलिया विवाह
रणबीर-आलिया विवाह

By

Published : Apr 13, 2022, 5:49 PM IST

मुंबई -सेलिब्रिटी प्रेयसी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा सोहळा अखेर आजपासून सुरू झाला आहे. रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आत्या रिमा जैन (दिवंगत ऋषी कपूर यांची बहीण) आणि चुलत बहीण निताशा नंदा (रितू आणि राजन नंदा यांची मुलगी) हे विवाहासाठी आलेल्या सुरुवातीच्या पाहुण्यांमध्ये होते. वांद्रे येथील रणबीरच्या निवासस्थानी येताना कुटुंबातील सदस्य आणि मित्र पारंपारिक पोशाखात दिसत होते.

रणबीरची आई नीतू कपूर मुंबईतील वांद्रे भागातील रणबीरच्या निवासस्थानी तिची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, नात समरा आणि जावई भरत साहनी यांच्यासह लग्नाआधीच्या उत्सवासाठी आल्या होत्या. एक पांढर्‍या रंगाची वातानुकूलित व्हॅनमधून हे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

रणबीरचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ आज रणबीरच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रणबीर आणि आलियाचा जवळचा मित्र अयान मुखर्जी याने त्यांच्या आयुष्याच्या नवीन सुरुवातीसाठी त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील जोडप्याचे प्रेमगीत अनावरण केले. रणबीर आणि आलियाचे बहुप्रतिक्षित लग्न रणबीरच्या घरी 4 दिवस चालणार आहे. आलिया आणि रणबीरने ब्रह्मास्त्रच्या सेटवर डेट करायला सुरुवात केली होती.

हेही वाचा -रणवीर आलिया विवाह : कडक बंदोबस्तात रणवीरच्या घरी लग्न उत्सवाला सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details