मुंबई- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचे कौतुक केले आहे. आणि मिश्कील विनोदासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामूने ( राम गोपाल वर्माला रामू या नावानेच ओळखले जाते ) एक मस्करीत ट्विट केले आहे. एसएस राजामौली यांना मिळालेल्या यशामुळे इतरजण त्यांच्यावर जळत असून इर्षा करत आहेत. त्यामुळे निर्माता दिग्दर्शक राजामोली यांच्यावर इतर निर्माते हल्ला करण्याची तयारी करत आहेत. यासाठी त्यांनी एक पथक बनवले असून, या पथकात आपलेही नाव असल्याचे रामूने म्हटलंय. हे गुपित चार पेग डाऊन असल्यामुळे कबुल करत असल्याचेही त्याने लिहिलंय.
राम गोपाल वर्माने ट्विटरवर 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्डमधील जेम्स कॅमेरॉन यांच्याशी झालेल्या संभाषणातील राजामौलीचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला जिथे RRR ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट जिंकला होता. त्यांनी त्याला कॅप्शन दिले: दादा साहेब फाळके यांच्यापासून आजपर्यंत, इतिहासात कोणीही एसएस राजामौलीसारखा भारतीय दिग्दर्शक कधीतरी या क्षणातून जाईल याची कल्पनाही केली नसेल.
निर्माता राम गोपाल वर्माने राजामौली यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आणि लिहिलं, 'हाय राजामौली सर, तुम्ही मुघले आझम हा चित्रपट बनवणाऱ्या के असिफ ते शोले बनवणाऱ्या रमेश सिप्पी पर्यंत आणि आदित्या चोप्रा, करण जोहर, भन्साळी यांच्या सारख्या प्रत्येक चित्रपट निर्मात्याला मागे टाकले आहे. यासाठी मला तुमच्या पायाचे बोट चोखायचे आहे.'