मुंबई - Ram charan : राम चरणनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकजणांची मने जिंकली आहेत. त्याचे अनेक चाहते आहेत. दरम्यान आता या खास प्रसंगी राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक कोलाज शेअर केले आहे. या कोलाजमध्ये तिनं त्याच्या 'आरआरआर' चित्रपटामधील दोन पोस्टर एकत्र करून यावर 'स्वीट सिक्सटीन' असं लिहलं आहे. रामनं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा सामंथा रुथ प्रभूसोबतचा 'रंगस्थलम' हा चित्रपट जबरदस्त हिट होता. चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचा 'रंगस्थलम' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण : हा चित्रपट श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, राजमुंद्री, नेल्लोर, अनंतपूर आणि हैदराबादमध्ये दाखविला जात आहे. 'रंगस्थलम'च्या पुन्हा एकदा रिलीज झाल्यानंतर राम हा खूप खुश झाला आहे. 'रंगस्थलम' चित्रपटाच्या रिलीजची घोषणेवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्यानं लिहलं कि, 'रामनं अप्रतिम 16 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. द सेलिब्रेशन्स गेटिंग बिग अँड बिगर.' दुसर्या चाहत्यानं कमेंट करत म्हटलं , 'राम चरणचा हा चित्रपट थिएटरमध्ये आणखी धमाल करणार आहे'. आणखी एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत म्हटलं, 'राम चरण हा खूप चांगला अभिनय करतो, त्याचे चित्रपट हिट होतात' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. काहीजण त्याला या खास प्रसंगी शुभेच्छा देत आहेत.