हैदराबाद : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि मेगा ब्लॉकबस्टर फिल्म 'RRR' फेम राम चरण तेजा याने त्याच्या चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की तो बाप होणार आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरण वडील होणार आहे.
राम चरणने २०१२ मध्ये उपासनासोबत लग्न केले होते. आता लग्नाच्या 10 वर्षानंतर राम चरण आणि उपासना यांच्या घरात पहिल्यांदाच पाळणा हलणार आहे. त्याचबरोबर साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी पहिल्यांदाच आजोबा बनणार आहेत. चिरंजवी आणि राम चरण या दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही खुशखबर सांगितली आहे.
पिता-पुत्राने मिळून दिली आनंदाची बातमी - चिरंजीवी आणि राम चरणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर बाल हनुमान लिहिलेले आहे, ''हनुमान जीच्या आशीर्वादाने... आम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण यांना पहिले अपत्य होणार आहे.''