महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant : शाहरुख खानच्या दुखापतीवर राखी सावंतची अनपेक्षित प्रतिक्रिया - शाहरुख खान

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान अमेरिकेत शूटिंगदरम्यान जखमी झाला होता, त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया केली. दुसरीकडे, किंग खानच्या दुखापतीची बातमी समजल्यानंतर बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतची अनपेक्षित प्रतिक्रिया समोर आली आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत

By

Published : Jul 5, 2023, 7:08 PM IST

मुंबई : बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या बेशिस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता नुकताच राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या उपचाराबाबत बोलताना दिसत आहे. नुकतेच राखी सावंतला एका इमारतीबाहेर स्पॉट केल्या गेले होते. राखीने यावेळी नारंगी रंगाचा क्रॉप टॉप आणि काळी पँट घातली होती. यादरम्यान पापाराझींनी तिला शाहरुख खानबद्दल प्रश्न विचारला आणि तसेच शाहरुख खानला अमेरिकेत शूट दरम्यान दुखापत झाल्याचे पापाराझीने राखीला सांगितले. त्यावर राखीने पापाराझीला अनपेक्षित प्रतिक्रिया देत म्हटले, 'शाहरुख आय लव्ह यू.'

राखीने शाहरुखबद्दल केले वक्तव्य : राखीने पापाराझीना विचारले की, 'नाक टूट गई क्या?' यावर पापाराझीने तिला सांगितले की, नाकावर थोडीशी जखम आहे, आणि यावर आता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर राखी म्हटले की, 'काही हरकत नाही, त्यांच्याकडे चांगले डॉक्टर आहेत, ते त्यांना बरे करतील.' ती पुढे म्हणाली, 'जर डॉक्टर शाहरुखला बरा करू शकले नाही तर मी येईन. मी त्याच्या नाकावर मलम लावीन. तुमचे नाक आणि सर्व काही ठीक होईल. असे राखीने म्हटले.

पायलटवर उडविले पैसे : यादरम्यान राखी पायलटवर पैसे उडविल्याबाबतही बोलताना दिसली. राखीने सांगितले की 'मला पायलटने यमराजाच्या तोंडून परत आणले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यमराजांनी मला आपल्याकडे बोलावण्याचे पूर्ण नियोजन केले होते. खराब हवामानात पायलटने आम्हाला सुरक्षितपणे उतरवले. याशिवाय राखीचा पायलटवर पैसे उडविण्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फार जास्त व्हायरल झाला आहे.

शाहरुख खान मायदेशी परतला : दरम्यान आता शाहरुख खान बुधवारी मायदेशी परतला आहे. पापाराझीने त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खान आणि लहान मुलगा अबराम खान यांनाही मुंबई विमानतळावर स्पॉट केले होते. किंग खान अमेरिकेत शूटिंग दरम्यान जखमी झाला होता. दुखापतीमुळे त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो बरा आहे.

हेही वाचा :

  1. Bawaal Teaser OUT : 'बवाल'चा टीझर रिलीज, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा चित्रपट 'या' तारखेला रिलीज होणार
  2. Kriti Sanon launches production house : क्रिती सेनॉनच्या प्रोडक्शन हाऊसचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत
  3. Tejas gets release date : कंगना रणौतच्या तेजसची रिलीजची तारीख जाहीर, तेजसची गणपथशी बॉक्स ऑफिसवर टक्कर

ABOUT THE AUTHOR

...view details