मुंबई - Rakhi Sawant files case : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीवर सध्या आदिल खान दुर्रानी, राजश्री मोरे आणि शर्लिन चोप्रा अनेक आरोप करत आहे. दरम्यान आता राखीने देखील तिच्या खास मैत्रिणी विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. राखीने राजश्री मोरेवर गंभीर आरोप केले आहेत. राजश्री मोरेनं राखीच्या चारित्र्यावर असभ्य टिप्पणी केल्याबद्दल तिने हे पाऊल उचललं आहे. राखीनं अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत मैत्रिण राजश्री मोरेवर भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामी), 504 (हेतूपूर्वक अपमान आणि चिथावणी देणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजश्री मोरेवर झाली केस दाखल : राखीचे राजश्री मोरेसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर राजश्रीनं एका पत्रकार परिषदेत राखीवर भाष्य केलं. राखीचे वकील अली काशिफ खान यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, या घटनेचे व्हिडिओ ऑनलाइन उपलब्ध आहेत. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी राजश्रीनं आदिल खान दुर्रानीला राखी बांधली होती. राखी बांधत असतानाचे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. राखी अनेकदा आदिल खान आणि राजश्री विषयी मीडियासमोर बोलत असते.