महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant in Hijab : लग्नानंतर राखी सावंत फातिमा दिसली भगव्या हिजाबमध्ये, यूजर्स म्हणाले... - users comments

अलीकडेच, आदिल खान दुर्रानीसोबत ड्रामा क्वीन राखी सावंतने लग्न केले. राखीने लग्न केल्यानंतर धर्म बदलला आणि आता तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिने भगव्या रंगाच्या हिजाबमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर सोशल मीडिया यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत.

Rakhi Sawant in hijab
लग्नानंतर राखी सावंत फातिमा दिसली भगव्या हिजाबमध्ये

By

Published : Jan 15, 2023, 3:20 PM IST

Updated : Jan 15, 2023, 4:04 PM IST

मुंबई :मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती आदिल खान दुर्रानीसोबतच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. राखी सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती भगव्या रंगाचा हिजाब परिधान केलेला दिसत आहे.

राखीने धर्म बदलला :बिग बॉस फेम अभिनेत्री राखी सावंतने बिझनेसमन आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर धर्म बदलला आणि आता तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. हे तिच्या विवाह प्रमाणपत्राद्वारे उघड झाले आहे. राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

हेही वाचा :राखीचे आदिल दुर्रानीसोबतचे लग्न खोटे नाही, वकिलांनी दिली प्रतिक्रिया

यूजर्सच्या कमेंट्स : राखीच्या ताज्या पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'फातिमा मॅम तुम्ही हिजाबमध्ये खूप छान दिसत आहात.' दुसऱ्याने लिहिले 'अल्लाह तुम्हा दोघांना सुखी ठेवो'. तिसऱ्याने लिहिले 'फातिमा जी, आता आम्ही तुम्हाला याच नावाने ओळखतो, धीर धरा, अल्लाह तुम्हाला नक्कीच यश देईल'.

निकाह नोंदवला गेला आहे : विशेष म्हणजे राखी सावंतने अलीकडेच खुलासा केला होता की, सात महिन्यांपूर्वी मुस्लिम रितीरिवाजांनुसार आदिलसोबत तिचा विवाह झाला होता आणि आदिल आपल्या बहिणीमुळे या लग्नाचा खुलासा करत नाही. त्याचवेळी, तिला निकाह संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अभिनेत्रीच्या गर्भधारणेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राखी सावंतने गर्भधारणेच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि उत्तरात फक्त 'नो कमेंट' म्हणाली. त्याचवेळी राखीची वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी लग्नाबाबत दावा केला आहे की, हे लग्न पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की, हा खोटा विवाह नाही, निकाहही नोंदवला गेला आहे.

लग्नानंतर राखी सावंतचे नाव :मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखीने गेल्या वर्षी 29 मे 2022 रोजी गुपचूप आदिलशी लग्न केले होते. या निकाहचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता या निकाहनंतर राखी सावंतचे आडनावही बदलले आहे. खरे तर राखी सावंतने निकाह नामाचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात मॅरेज सर्टिफिकेटमध्ये तिच्या नावासोबत फातिमा लिहिले आहे. आता तिला राखी सावंत फातिमा म्हटले जात आहे.

Last Updated : Jan 15, 2023, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details