मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सध्या राखी पोलीसांच्या ताब्यात आहे.
शर्लिन चोप्राने ट्विट करत राखीच्या अटकेची माहिती दिली. शर्लिन चोप्राने ट्विट करत राखीच्या अटकेची माहिती दिली : राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदार मॉडेलच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शर्लिन चोप्राने ट्विट करत राखीच्या अटकेची माहिती दिली आहे. नुकतेच राखीने आईच्या आजारपणाची व्यथा मांडली. एकीकडे राखीला वैवाहिक जीवनाची चिंता आहे. तर दुसरीकडे राखीची आई आजारी आहे.
मुकेश अंबानीने राखीच्या आईच्या उपचारासाठी केली मदत मुकेश अंबानीने राखीच्या आईच्या उपचारासाठी केली मदत : राखी सावंतची आई कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. नुकतेच राखीने सोशल मीडियावर आईच्या आजारपणाची व्यथा मांडली होती. राखी म्हणाली की, आईला ओळखता येत नाही. तिला जेवायलाही जमत नाही. अशा काळात मुकेश अंबानी त्यांच्यासाठी मसिहा बनून आले आहेत. मुकेश अंबानी राखीच्या आईच्या उपचारात मदत करत आहेत.
राखीने भगव्या रंगाचा हिजाब परिधान केला होता. राखीने भगव्या रंगाचा हिजाब परिधान केला होता : मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती आदिल खान दुर्रानीसोबतच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. राखी सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती भगव्या रंगाचा हिजाब परिधान केलेला दिसत आहे.
राखी सावंतने लग्नानंतर धर्म बदलला राखीने धर्म बदलला : बिग बॉस फेम अभिनेत्री राखी सावंतने बिझनेसमन आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर धर्म बदलला आणि आता तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. हे तिच्या विवाह प्रमाणपत्राद्वारे उघड झाले आहे. राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
राखीचा गर्भपात नाहीच : राखी सावंतचा गर्भपात झालाच नाही असा खुलासा तिचा पती आदिलने केला आहे. राखी बिग बॉसमध्ये होती. त्यावेळी ती गर्भवती होती अशा बातम्या आल्या होत्या. मात्र तिच्याच पतीने आता हे सगळे थोतांड असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्याने स्पष्ट केले आहे. इंस्टाग्रामवर या जोडप्याने एक संयुक्त पोस्ट शेअर केली. त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला होता. आदिल म्हणाला, ही फेक न्यूज आहे. राखीचा गर्भपात झालेला नाही. मी सर्वांना विनंती करतो की, कृपया असे खोटे विषय प्रकाशित करू नका. पोस्ट शेअर करताना आदिलने लिहिले की, 'फेक न्यूज.'