महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant Mother : आईच्या मृत्यूनंतर राखी सावंतला अश्रू अनावर, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा यांचे शनिवारी निधन झाले. आईच्या निधनानंतर राखीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. ती व्हिडिओमध्ये ढसाढसा रडताना दिसत आहे. ती तिच्या मित्र-मैत्रिणींना विचारते आहे की, आदिल कुठे आहे.

Rakhi Sawant Mother passes away
आईच्या मृत्यूनंतर राखी सावंत रडली ढसाढसा

By

Published : Jan 29, 2023, 10:36 AM IST

Updated : Jan 29, 2023, 11:20 AM IST

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतवर शनिवारी दु:खाचा डोंगर कोसळला. राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कॅन्सर झाल्याचे राखी सावंतनेच सोशल मीडियावर लाईव्ह करून सांगितले होते. नंतर आईची तब्येत बिघडत असल्याचे देखील राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. आज राखीची आई जया सावंत यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गेले अनेक दिवस मृत्यूशी लढत असलेली लढाई जया सावंत हरल्या आहेत. त्यांचे अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात निधन झाले आहे.

नातेवाईकांनी तिचे सांत्वन केले :शनिवारी रात्री उशिरा राखी सावंतच्या तिच्या आईच्या मृतदेहासोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. ती आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुंबईला घेऊन जात होती. आईच्या निधनानंतर ती ढसाढसा रडली. राखीने मीडियाला सांगितले की, तिची आई आता या जगात नाही. ती म्हणाली, 'एका दिवसापूर्वी आईला खूप वेदना होत होत्या. आईला खूप त्रास झाला. तिला वेदना होत होत्या आणि ती खूप ओरडायची. राखीने सांगितले, 'आई नाही राहिली.' यावेळी राखीच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिचे सांत्वन केले.

आईच्या निधनानंतर राखीचा व्हिडिओ : आईच्या निधनानंतर राखीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. ती व्हिडिओमध्ये ढसाढसा रडताना दिसत आहे. ती तिच्या मित्र-मैत्रिणींना विचारते आहे की, आदिल कुठे आहे? 'सलमान भाई, माँ मार गई' राखीने पापाराझींना सांगितले की, रविवारी तिच्या आईचे अंतिम संस्कार केले जातील. यादरम्यान राखीला तिचा नवरा आदिल दुर्रानी आठवला. ती तिच्या मित्रांना म्हणाली, आदिलला फोन करा. त्याला सांगा की, आई वारली आहे.

सलमान खानच्या भावाने मदत केली :2021 सलमान खानच्या भावाने राखीला मदत केली होती, राखीची आई जया भेडा यांना ब्रेन ट्युमर आणि कॅन्सर होता. त्यांना जुहू येथील क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राखी नेहमीच तिच्या आईचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात तिच्या चाहत्यांना आणि मित्रांना तिच्या आईच्या ढासळत्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. 'बिग बॉस' दरम्यान राखीने खुलासा केला होता की, ती तिच्या आईच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी हा शो करत आहे. 2021 मध्ये, सलमान खानचा भाऊ सोहेल खान यानेही तिला हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी आर्थिक मदत केली.

हेही वाचा :राखी सावंतच्या आईचे मुंबईत निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी

Last Updated : Jan 29, 2023, 11:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details