नवी दिल्ली :शर्लिन चोप्राने ट्विटमध्ये म्हणाली, ब्रेकिंग न्यूज!!! आंबोली पोलिसांनी राखी सावंतला काल एफआयआर 883/2022 नुसार अटक केली आहे, राखी सावंतचा एबीए 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. लवकरच राखीला अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. शर्लिनने सोशल मीडियावर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करत राखीविरोधात तक्रार दाखल केली होती.
राखी आणि शर्लिनमध्ये शाब्दिक युद्ध : यापूर्वी, राखी सावंतने शर्लिन चोप्राने MeToo संदर्भात चित्रपट निर्माता साजिद खानवर केलेल्या आरोपांवर टिप्पणी केल्यानंतर राखी आणि शर्लिनमध्ये शाब्दिक युद्ध झाले होते. तिने तिची नक्कल केली आणि शर्लिनने केलेले सर्व दावे खोडून काढले. शर्लिनने नंतर राखीला प्रत्युत्तर दिले आणि म्हणाली, 'क्या है ये नौटंकी? मूर्खपणा! क्या जिम के अंदर घुसो, मेहनत करो, बॉडी बनाओ लेकिन नहीं, मेहनत नहीं करनी मॅडम को. 24 घंटा सिरफ मीडिया-पापाराजी, मीडिया पापाराझी.'
राखी सावंत आणि शर्लिन चोप्राची पोलिसांत तक्रार
राखी सावंत आणि शर्लिन चोप्राची पोलिसांत तक्रार :राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा' वापरल्याप्रकरणी एकमेकांवर गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत आणि अधिवक्ता फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
राखी सावंतनेही शर्लिन चोप्राविरोधात एफआयआर दाखल केला
राखी सावंतनेही शर्लिन चोप्राविरोधात एफआयआर दाखल केला : राखीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, शर्लिनने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शर्लिनने तिच्यावर अनेक बॉयफ्रेंड असल्याचा आरोप केला होता. राखीने पोलिसांना सांगितले की, शर्लिनने तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि अपशब्द वापरले. यापूर्वी राखीने शर्लिन चोप्रावर मानहानीचा खटला दाखल केला होता. या दोन्ही अभिनेत्रींमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.