मुंबई :बॉलिवूडचा अभिनेता सनी देओलचा धाकट मुलगा राजवीर देओल हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सनी देओलने आपल्या धाकट्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले असून २४ जुलै रोजी 'दोनो'चे पोस्टर शेअर करून या चित्रपटाबाबत एक घोषणा केली आहे. या पोस्टरमध्ये राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन बीचवर बसलेले दिसत होते. हे पोस्टर शेअर करून सनी देओलने सांगितले होते की, चित्रपटाचा पहिला टीझर २५ जुलैला म्हणजेच आज रिलीज होणार आहे. तसेच आजच २५ जुलै रोजी 'दोनो' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. पलोमा ढिल्लन ही ८०च्या दशकातील अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी आहे. राजवीर आणि पलोमा ढिल्लन या स्टार किडची इनोसेन्स लव्ह स्टोरी चित्रपट 'दोनो'ची निर्मिती राजश्री प्रॉडक्शन करत असून अविनाश बडजात्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
कसा आहे दोन्ही चित्रपटांचा टीझर? : 'दोनो' चित्रपटाचा टीझर १.१० मिनिटांचा आहे. चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला देव (राजवीर देओल) आणि मेघना (पलोमा) बीचवर बसलेले दिसत आहेत. दोघेही आपापल्या मित्राच्या लग्नाला आले असून या लग्नात ते पहिल्यांदाच भेटले आहेत. देव ही वधू आहे आणि मेघना ही वराची मैत्रिण आहे. या लग्नात मेघना आणि देव यांची चांगली मैत्री होते. मध्यभागी बसलेली मेघना तिच्या शेजारी बसलेल्या देवला विचारते की, आपण नकाराची इतकी भीती का बाळगतो?