महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राजू श्रीवास्तव ९ दिवसापासून आयसीयूमध्ये बेशुद्ध, शेखर सुमनचे प्रार्थना करण्याचे आवाहन - राजू श्रीवास्तव ९ दिवसापासून आयसीयूमध्ये बेशुद्ध

गजोधर भैय्या नावाने प्रसिद्ध असलेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका येऊन 8 दिवस उलटूनही अद्याप तो शुद्धीवर आलेला नाही. अभिनेता शेखर सुमन यांनी ट्विट करून प्रार्थना करा असे म्हटले आहे.

शेखर सुमनचे प्रार्थना करण्याचे आवाहन
शेखर सुमनचे प्रार्थना करण्याचे आवाहन

By

Published : Aug 18, 2022, 4:05 PM IST

नवी दिल्ली प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या 9 दिवसांपासून राजधानी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. कॉमेडियनची तब्येत ढासळत चालली असून त्याला अजूनही शुद्ध आलेली नाही. 18 ऑगस्ट रोजी आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने राजू यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

डॉक्टरांनी सांगितले की कॉमेडियनच्या मेंदूला दुखापतीच्या खुणा आहेत आणि त्याच्या हृदयाच्या गतीची नाडी देखील सामान्यपणे काम करत आहे. राजूचा १३ ऑगस्टला एमआरआय झाला. एमआरआय अहवालात डोक्यावर डाग असल्याचे दिसून आले. डॉक्टरांच्या मते, हे डाग म्हणजेच दुखापतीची चिन्हे आहेत.

प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन यांनी सांगितले की ते कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'राजूची प्रकृती स्थिर असल्याचे आजचे अपडेट आहे. अजूनही बेशुद्ध आहे पण स्थिर आहे. त्यांना बरे होण्यासाठी आणखी आठवडा लागेल. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. हर हर महादेव'.

याआधी शुक्रवारी राजू श्रीवास्तव कुटुंबाकडून त्यांच्या तब्येतीचे अपडेट आली होती, त्यानंतर कॉमेडियनच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. कॉमेडियनची तब्येत सुधारत असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते.

कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा आणि खोट्या गोष्टी पसरवू नका, असे आवाहन कुटुंबीयांनी केले होते. आता पुन्हा एकदा कॉमेडियनच्या ढासळत्या प्रकृतीमुळे चाहत्यांचा श्वास गुदमरला आहे.

हेही वाचा -शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूरचा डान्स व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details