नवी दिल्ली- लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव ( Raju Srivastava ) दिल्लीतील एम्सच्या ( AIIMS ) अतिदक्षता विभागात (आयसीयू) "अत्यंत गंभीर आणि व्हेंटिलेटरवर" असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. 58 वर्षीय श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा ( heart attack ) झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी ( angioplasty ) करण्यात आली.
“श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत,” असे सूत्राने एका न्यूजवायरला सांगितले. कॉमेडियनवर एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश नाईक उपचार करत आहेत.
श्रीवास्तव यांचे चुलत भाऊ अशोक श्रीवास्तव यांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले होते की, राजू श्रीवास्तवला व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. "तो आपला नियमित व्यायाम करत होता आणि ट्रेडमिलवर असताना तो अचानक खाली पडला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला ताबडतोब एम्स रुग्णालयात नेण्यात आले," असे त्याने सांगितले होते. अभिनेता-कॉमेडियन राजूची पत्नी शिखा श्रीवास्तव दिल्लीत पोहोचली आहे.