मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार रावच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजकुमार हा लवकरच शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला आणि हसत हसत देशासाठी बलिदान दिले त्याच्यासाठी हा चित्रपट समर्पित असणार आहे. हा चित्रपट बनवायची तयारी सध्याला सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राजकुमार त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल फार उत्सुक आहे. यापूर्वी 2017 मध्ये या त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. राजकुमारच्या सुभाषचंद्र बोस या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिले होते. आता तो पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करायला येत आहे.
राजकुमार दिसणार शहीद भगतसिंगच्या भूमिकेत : नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव म्हटले, भगतसिंग यांची भूमिका साकारणे हे त्यांच्या स्वप्नांपैकी एक आहे. राजकुमार आता त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहे आणि त्याच्या टीमसोबत कामात व्यस्त आहे. तो 'स्त्री 2' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच राजकुमार पुन्हा एका चर्चेत आला होता. तसेच त्यांची स्त्री 2 शूटिंग सध्याला सुरू आहे. तसेच त्याने काही दिवसापूर्वी सेटवरील एक फोटो देखील त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे सध्याला राजकुमार हा व्यस्त आहे. दुसरीकडे भगतसिंगच्या चित्रपटाविषयी बोलायला गेले तर या चित्रपटाला, ओटीटीवर आणण्याची तयारी सुरू आहे. हा चित्रपट फक्त ओटीटी फॉरमॅटमध्ये बनवला जात आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 6 ते 8 महिने लागतील. तसेच राजकुमारचा अभिनय हा फार जास्त प्रेक्षकांना आवडतो त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार असे दिसत आहे. हा चित्रपट देशभक्तीवर असल्याने या चित्रपटात अनेक अशा गोष्टी दाखविल्या जाणार ज्यामुळे प्रेक्षक फार भावूक होईल.