मुंबई - Rajinikanths Jailer will arrive on OTT रजनीकांतची भूमिका असलेल्या 'जेलर' चित्रपटानं १० ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर वादळ निर्माण केलं होतं. सन पिक्चर्सनं निर्मिती केलेला हा चित्रपट नेल्सन दिलीपकुमारने दिग्दर्शित केला होता. गेली महिनाभर बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे.
या क्राईम ड्रामा चित्रपट जेलर विषयी आपले विचार एका वेबलाईडशी मांडताना नेल्सन दिलीपकुमार म्हणाला की या सिनेमाने फिल्म इंडस्ट्रीत एक लाट निर्माण केली. हा केवळ चित्रपट नाही तर मानवी भावना, न्याय आणि कुटुंबातील अतूट नाते यांचा मेळ आहे. भाषेच्या अडथळ्यांना पार करणारी एक आकर्षक कथा तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले होतं, असंही नेल्सन म्हणाले. चित्रपटाला चांगलं यश मिळाल्यानंतर आता हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार असल्याचंही नेल्सन दिलीप कुमार यांनी सांगितलं. यामुळे मोठा समुदाय या चित्रपटाशी नव्यानं जोडला जाईल असेही ते म्हणाले.
जेलरच्या आशयाबद्दल बोलताना त्यांनी शेअर केलं की, याचं दिग्दर्शन करणं आणि लेखनं करणं हे एक प्रतिष्ठेचं वाटंत होतं. हा चित्रपट केवळ अॅक्शन सीक्वेन्स आणि सस्पेन्सबद्दल मानवी मनाच्या लवचिकतेबद्दलही आहे. रिटायर्ड जेलर 'टायगर' मुथुवेल पांडियनची ही कथा आहे जी रजनीकांत यांच्यावर उत्तम चित्रीत झाली आहे. मुलांच्या मृत्यनंतर न्यायासाठी अथक लढणारा, कठीण मार्गावरुन जाताना अनक आव्हानं पेलणारा आणि चारित्र्याची खडतर परीक्षा देणाऱ्या पात्राची ही कथा प्रेक्षकांना खुर्चीत गुंतवून टाकण्यात यशस्वी ठरल्याचं दिसलं.
जेलर चित्रपट समाजातली गडद बाजू आणि योग्या की अयोग्य यातील रेषा शोधणारा रंजक चित्रपट आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रीतील लोकांना हा चित्रपट आवडेल असा विश्वास यावेळी नेल्सन दिलीप कुमारने व्यक्त केला.