महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rajinikanth to retirement : सुपरस्टार रजनीकांत 171 व्या चित्रपटानंतर निवृत्ती घेणार ? - सुपरस्टार रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी लोकेश कनागराज दिग्दर्शित आगामी 171 व्या चित्रपटानंतर निवृत्ती घेणार असल्याचा दावा तमिळ दिग्दर्शक आणि निर्माता मायस्किन यांनी एका मुलाखतीत केला होता. परंतु रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे कधीही बंद करणार नाहीत, असा विश्वास त्याच्या चाहत्यांन वाटत आहे.

Rajinikanth to retirement
सुपरस्टार रजनीकांत 171 व्या चित्रपटानंतर निवृत्ती घेणार ?

By

Published : May 19, 2023, 8:07 PM IST

चेन्नई- तामिळ सुपरस्टार रजनीकांत हे लोकेश कनागराज दिग्दर्शित त्याच्या आगामी 171 व्या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीचा निरोप घेण्याचा विचार करत आहेत अशी एक चर्चा आहे. तमिळ चित्रपट निर्माते मायस्किन यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. मायस्किन यांनी म्हटले होते की, रजनीकांतचा तरुण दिग्गज दिग्दर्शक लोकेश कंगाराजसोबत शूट होत असलेला चित्रपट हा सुपरस्टारच्या चित्रपट कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो.

सुपरस्टार रजनीकांत निवृत्ती घेणार असल्याचे भाष्य - निर्माता दिग्दर्शक मायस्किन यांनी केलेले हे वक्तव्य विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे. रजनीकांतच्या अनेक चाहत्यांनी यावर विश्वास ठेवण्यास नकार दिल्याने या खुलाशाने सोशल मीडियावर वादळी चर्चा सुरू झाली आहे. रजनीकांत असा कोणताही निर्णय घेणार नाहीत यावर चाहत्यांचा पूर्ण विश्वास आहे. स्वतः रजनीकांत यांनी निवृत्तीबद्दल कधीही भाष्य केलेले नाही, त्यामुळे ही बातमी निराधार असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.

रजनीकांत यांचे आगामी चित्रपट - सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी जेलर हा चित्रपट पडद्यावर येणार आहे. नेल्सन दिग्दर्शित जेलर 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. यानंतर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शन करत असलेला लाल सलाम हा चित्रपट त्यानंतर रिलीज होणार आहे. त्यानंतर रजनीकांतचा 170 वा चित्रपट थलाईवर 170 या तात्पुरत्या शीर्षकाखाली टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित करणार आहेत. यानंतर थलायवर 171 चे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करण्याची शक्यता वर्तवली जाते.

रजनीकांतच्या निवृत्तीचा मायस्किनकडून दावा - दिग्दर्शक मायस्किन यांनी आपल्या मुलाखतीत खुलासा केला की रजनीकांत त्यांच्या 171 व्या चित्रपटासाठी विक्रम आणि कनागराजसोबत एकत्र काम करणार आहेत. मायस्किनच्या म्हणण्यानुसार, रजनीकांतने स्वतः लोकेशशी संपर्क साधला होता आणि त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकेश आणि मायस्कीन यांचे लिओ चित्रपटामुळे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मायस्कीनने या चर्चेला वळण दिले आणि थलैवर 171 हा रजनीच्या जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो, असे भाष्य केले. मात्र याबाबत शंभर टक्के खात्री नसल्याचे त्यांनी सांगितले.

रजनीच्या चाहत्यांचा बुलंद विश्वास - रजनीच्या चाहत्यांचे म्हणण्यानुसार त्याच्या निवृत्तीच्या चर्चा २०१८ पासून सुरू आहेत. त्यानंतर त्यांनी काला, 2.0, पेट्टा, दरबार, अन्नाथे आणि आगाम जेलर, लाल सलाम हे चित्रपट स्वीकारले आहेत. त्यामुळे चाहत्यांना खात्री आहे की रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे कधीच थांबवणार नाहीत. रजनीकांत केवळ तामिळनाडू आणि उर्वरित दक्षिण भारतातच नव्हे तर देशभरातील लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो. त्याच्या चित्रपटाचा रिलीजचा क्षण लाखो चाहते एखाद्या सणासारखा साजरा करतात.

हेही वाचा -Cannes 2023 : मृणाल ठाकूरने रेड कार्पेटवर केले सौदर्यांचे प्रदर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details