चैन्नई (तामिळनाडू) Rajinikanth : साउथ अभिनेता रजनीकांतचे जगभरात करोडो चाहते आहेत. रजनीकांतचा चित्रपट जेव्हाही प्रदर्शित होते, तेव्हा हे तमाम चाहते त्याच्या चित्रपटाचे स्वागत मोठ्या जल्लोषानं करतात. रजनीकांतची प्रत्येक चित्रपटातील स्टाईल, त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना भारावून सोडतो. रजनीकांतसाठी काहीपण करण्यासाठी त्याचे चाहते एका पावलावर सज्ज असतात. दरम्यान रजनीकांतच्या एका मोठ्या चाहत्यानं तमिळनाडूतील मदुराई येथे थलायवाला समर्पित एक मंदिर बांधलं आहे. स्वतःला रजनीकांतचा चाहता म्हणणाऱ्या कार्तिकनं आपल्या घराचा काही भाग मंदिरात बदलवला आहे. या मंदिरात त्यानं रजनीकांतची मूर्ती बसवली आहे.
रजनीकांतचं मंदिर :कार्तिकच्या मते, रजनीकांतच्या मूर्तीचे वजन 250 किलो आहे. मीडियासोबत बोलताना त्यानं म्हटलं, 'आमच्यासाठी रजनीकांत हेच देव आहेत. त्यांच्यासाठी आदराचे प्रतीक म्हणून मी मंदिर बांधलं आहे'. त्यानंतर कार्तिकची मुलगी अनुशिया हिनेही रजनीकांतचे कौतुक केलं. तिनं सांगितले की, 'आम्ही रजनीकांतच्या मूर्तीची पूजा मंदिरातील देवाप्रमाणे करतो.' रजनीकांतचे जगभरातील चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वाट खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. याशिवाय काही चाहते, तर पदेशातून फस्ट डे फस्ट शो पाहायला भारतात येतात. रजनीकांत अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असतात.