हैदराबाद- रजनीकांत यांनी दिवंगत अभिनेते आणि महेश बाबू यांचे वडील घटामनेनी कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली. सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
रजनीकांत यांनी सुपरस्टार कृष्णा यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. याची आठवण ठेवत रजनीकांत यांनी लिहिले, "कृष्णा गरू यांचे निधन हे तेलुगू चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान आहे... त्यांच्यासोबत 3 चित्रपटांमध्ये काम करणे या माझ्या आठवणी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना ...त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
सुपरस्टार कृष्णा यांच्या निधनावर रजनीकांत व्यतिरिक्त इतर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. कृष्णाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अभिनेता चिरंजीवीने आपल्या मातृभाषेत एक लांबलचक चिठ्ठी लिहिली आहे.
ज्यू. एनटीआरने लिहिले, "माझे विचार महेश अण्णा आणि कुटुंबासोबत आहेत. ओम शांती. सुपरस्टार सदैव."
महेश बाबूचे वडील कृष्णा यांना सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.