महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rajinikanth : रजनीकांतने 'जेलर'च्या क्रूसह यशाचा आनंद केला साजरा... - रजनीकांत आणि जेलर

रजनीकांत हे 'जेलर'च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चेन्नईला पोहोचले. याठिकाणी त्यांनी 'जेलर' क्रूसह केक कापला. तर आता टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित चित्रपट '१७०'मध्ये रजनीकांत हे दिसणार आहे.

Rajinikanth
रजनीकांत

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 4:19 PM IST

मुंबई :साऊथ स्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर खूप मोठा धमाका केला आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला असून 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. 'जेलर'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून अधिक कमाई केली. देशभरात चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त पाठिंबा मिळत असताना, रजनीकांतने चेन्नईमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या क्रूसोबत 'जेलर'चे यश साजरे केले.

क्रूसह रजनीकांत यांनी कापला केक :काही दिवसांपूर्वी रजनीकांत हे हिमालयातील आध्यात्मिक प्रवासाला गेले होते. आता या प्रवासानंतर ते चेन्नईला परतले आणि 'जेलर'च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी क्रूमध्ये सामील झाले आहेत. क्रूसह रजनीकांत यांनी आपल्या टीमसोबत केकही कापला. या अ‍ॅक्शन ड्रामामध्ये रजनीकांत हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात विनायकन, रम्या कृष्णन आणि वसंत रवी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मोहनलाल, शिवा राजकुमार आणि जॅकी श्रॉफ हे चित्रपटात स्फोटक कॅमिओ भूमिकेत दिसले आहेत.

'जेलर'ने रचला इतिहास : या पार्टीला 'जेलर'चे दिग्दर्शक नेल्सन, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, रम्या कृष्णन आणि निर्मिती युनिटमधील इतर सदस्य उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सद्वारा करण्यात आली आहे. 'जेलर'ने भारतात ३०० कोटींचा पराक्रम साधल्यानंतर जगभरात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'जेलर' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह भारतात या अ‍ॅक्शन चित्रपटाने प्रचंड कलेक्शन केले आणि एक इतिहास रचला आहे. याबरोबर 'जेलर'ने तमिळनाडूमध्ये अधिक कमाई केली. दरम्यान टीजे ज्ञानवेल '१७०'नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. '१७०' चित्रपटात अमिताभ बच्चन, मंजू वॉरियर, फहद फासिल आणि शरवानंद हे देखील कलाकार दिसणार आहेत. याशिवाय '१७०' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाबाबतही चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

  1. Hema Malini : धर्मेंद्र-शबाना आझमी किसिंगबाबतच्या प्रश्नावर हेमा मालिनी यांचं... यूं कि, ये कौन बोला?
  2. Gadar 2 vs OMG 2 box office collection day 15 : रिलीजच्या १५व्या दिवशी 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'च्या कमाईचा वेग मंदावला...
  3. Malaika Arjun Breakup : मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप? वाचा काय म्हणाली रिलेशनमध्ये ट्विस्ट आणणारी कुशा...

ABOUT THE AUTHOR

...view details