महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rajasthan Destination Weddings : डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थान ही सेलेब्रिटी स्टार्सची बनली पहिली पसंती - destination weddings

डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थान ही स्टार्सची पहिली पसंती बनली आहे. बॉलीवूड-हॉलिवूडमधील अनेक स्टार्सने राजस्थानमध्ये लग्न केले आहे. अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आपण आता बोलणार आहोत.

Rajasthan Destination Weddings
राजस्थान डेस्टिनेशन वेडिंग

By

Published : Jun 17, 2023, 12:39 PM IST

मुंबई : डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थान ही बॉलीवूड-हॉलिवूड स्टार्सची पहिली पसंती बनली आहे. अनेक बॉलीवूड-हॉलिवूड स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी येथे लग्न केले आहे. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या नावाचा समावेश होणार आहे. जाणून घ्या राघव आणि परिणीती कुठे घेणार आहे सात फेरे...

उदयपूर लग्नासाठी प्रसिद्ध ठिकाण :उदयपूर देशात आणि जगात आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील असलेले हे शहर आणखी एका शाही लग्नाचे साक्षीदार होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे स्थळ समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी, दोघांनीही दिल्लीत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते, त्यानंतर लवकरच उदयपूरमध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहेत. परिणीती-राघवच्या आधीही राजस्थानमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचे रॉयल वेडिंग झाल्या आहेत.

पॅलेशियल हॉटेलमध्ये होऊ शकते लग्न : काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव लग्नाच्या ठिकाणाच्या शोधात राजस्थानमधील उदयपूरला पोहोचले होते. त्यानंतर हे जोडपे उदयपूरच्या आलिशान पॅलेस द ओबेरॉय उदयविलासमध्येही गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार , येत्या महिन्यात हे जोडपे येथे डेस्टिनेशन वेडिंग करू शकतात. या हॉटेलबद्दल बोलायचे झाले तर, हे आलिशान पॅलेस हॉटेल पिचोला तलावाच्या काठावर वसलेले आहे. हॉटेलमध्ये सुंदर भव्य उद्यान आहे. जगातील पहिल्या क्रमांकाच्या हॉटेलचा मान याला मिळाला आहे. या लक्झरी हॉटेलमध्ये ईशा अंबानीचे प्रिव्हेंडिंग फंक्शन्सही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये परिणीती आणि प्रियांका या दोघी बहिणी सहभागी झाल्या होत्या.

याआधी कुठल्या सेलिब्रिटींनी राजस्थानमध्ये केले लग्न : बॉलीवूड स्टार्सपासून सेलिब्रिटींपर्यंत, राजस्थान सर्वांसाठी एक योग्य वेडिंग डेस्टिनेशन बनले आहे. येथील राजेशाही शैलीसोबतच आदरातिथ्यही फार आकर्षित आहे. याच कारणामुळे कॅटरिना कैफ-विक्की कौशल, प्रियांका-निक जोनास ते पॉप स्टार कॅटी पेरी-रसेल ब्रँडसह अनेक स्टार्सनी राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले आहे.

प्रियांका चोप्रा निक जोनास : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा उदयपूरमध्ये विवाह झाला. या जोडप्यांनी राजस्थानमध्ये सात फेरे घेतले होते. या विवाहात अनेक सेलिब्रिटी आले होते. हा विवाह फार शाही झाला होता.

संजय हिंदुजा आणि अनु महतानी : हिंदुजा ग्रुपचे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजा याने 13 फेब्रुवारी 2015 रोजी अनु महतानीसोबत उदयपूरच्या उदय विलास पॅलेसमध्ये लग्न केले. या लग्नात देखील अनेक सेलिब्रिटी आले होते.

पॉपस्टार गायिका कॅटी पेरी आणि रसेल ब्रँड: अमेरिकन पॉपस्टार गायिका केटी पेरी आणि अभिनेता-कॉमेडियन रसेल ब्रँड यांचा विवाह 23 ऑक्टोबर 2010 रोजी राजस्थानमधील रणथंबोर येथे पारंपारिक हिंदू रितीरिवाजांनुसार झाला.

रवीना टंडन आणि अनिल थडानी : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूरच्या जग मंदिर पॅलेस हॉटेलमध्ये चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केले. हे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडले.

नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय:बॉलीवूड अभिनेता नील नितीन मुकेश यांनी रुक्मिणी सहाय यांच्याशी 2017 मध्ये उदयपूरच्या रेडिसन ब्लू पॅलेसमध्ये लग्न केले.

एलिझाबेथ हर्ले आणि अरुण नायर:हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेने 2 मार्च 2007 रोजी सुडेली कॅसल येथे भारतीय उद्योगपती अरुण नायरशी विवाह केला. त्यानंतर पुन्हा या जोडप्याने जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले.

विक्रम चटवाल ​​आणि प्रिया सचदेव:अमेरिकन हॉटेल व्यावसायिक आणि अभिनेता विक्रम चटवालने 18 फेब्रुवारी 2006 रोजी उदयपूरमध्ये मॉडेल प्रिया सचदेवसोबत लग्न केले. या लग्नात 26 देशांतून जवळपास 600 पाहुणे भारतात आले होते.

सेलेब्सने लग्नासाठी उदयपूरची निवड केली : दरवर्षी अनेक जोडपी प्री-वेडिंग शूट आणि रॉयल वेडिंगसाठी उदयपूरला जातात. यामध्ये अनेक हॉलिवूड, बॉलिवूड आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनीही तलावांच्या शहराला भेट देण्यासाठी उदयपूर गाठले. साखरपुड्यानंतर दोघेही त्यांच्या लग्नासाठी रिसॉर्ट पाहण्यासाठी उदयपूरला आले होते.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूर प्रसिद्ध : डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूर हे सर्वात पसंतीचे ठिकाण मानले जाते. बदलत्या हवामानानुसार, वारसा आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील प्रमुख पर्यटन स्थळे पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. उदयपूरमध्ये जग मंदिर, लेक पॅलेस, सज्जनगड, पिचोला, दूध तलाई, सहेलियों की बारी, सुखाडिया सर्कल, प्रताप गौरव केंद्र, फतेहसागर, शिल्पग्राम, बडी तलाव आणि इतर प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. मेवाडमधील आराध्या देव एकलिंग मंदिर, जगदीश मंदिर, महाकाल मंदिर, बौहरा गणेश मंदिर, करणी माता आणि नीमच माता मंदिरासह अंबामातेला देखील भेट देण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात.


हेही वाचा :

  1. Katrina-Vicky Airport video : कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलसोबत गप्पा मारताना आलिया झाली स्पॉट
  2. Tamannaah Bhatia wedding plans: तमन्ना भाटियाने लग्नाच्या प्लॅनबद्दल केला खुलासा...
  3. Karan Deol's mehendi ceremony : सनी देओलच्या घरी लगीनगाई, धर्मेंद्रच्या घरी वाजंत्र्यांची लगबग

ABOUT THE AUTHOR

...view details