महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राहुल महाजन चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? फोटो व्हायरल - राहुल महाजननं शेअर केला फोटो

Rahul Mahajan 4th Marriage: राहुल महाजनचा एक फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक महिला दिसत आहे. दरम्यान अनेकजण त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला चौथ्या लग्नाबद्दल विचारत आहेत.

Rahul Mahajan 4th Marriage
राहुल महाजन चौथं करणार लग्न?

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 2:55 PM IST

मुंबई - Rahul Mahajan 4th Marriage: माजी भाजपाचे दिवंगत नेता प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. त्याचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. दरम्यान त्याचा इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक महिला दिसत आहे. या फोटोवरून तो चौथ्यांदा लग्न करेल अशा सध्या चर्चा सुरू आहेत. त्याच्या या पोस्टच्या कमेंट विभागात अनेकजण कमेंट करून त्याला चौथ्यांदा लग्न करत असल्याचं विचारत आहेत.

राहुल महाजन शेअर केला फोटो : राहुलच्या व्हायरल झालेल्या फोटोवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं. 'राहुल तू पुन्हा लग्न करणार आहेस का'. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'चौथ्यांदा लग्न करत आहे वाटतं , लग्न करत रहा'. त्यानंतर आणखी एकानं लिहिलं, 'कोणा कोणावर प्रेम करू' (किस किस को प्यार करूं ) अशा अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत. राहुल महाजन अनेकदा अनेक वादांमध्येही अडकला आहे. 2008मध्ये तो बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या सीझनमध्ये त्यानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं.

राहुल महाजनचं लग्न : राहुलचं पहिलं लग्न श्वेता सिंगसोबत झालं होतं. परंतु काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर यानं एका रिएलिटी शोमधून डिंप्पी गांगूलीशी लग्न केलं. त्याचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. डिंप्पी गांगुलीनं राहुल महाजनवर घरगुती हिंसेंचे आरोप केले होते. त्यानंतर यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर डिंप्पीनं दुसरे लग्न केले. राहुलनं 2018 मध्ये तिसरं लग्न नतालिया इलिनाशी केलं. मात्र काही काळानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. आता त्यानं अनास्तासिया खिझन्याक या महिलेसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून चौथ्या लग्नाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा :

  1. "चित्रपटात मला हास्य अभिनेता म्हणून घेण्यास हरकत नसावी" देवेंद्र फडणवीस
  2. डिसेंबर 2023 मध्ये ओटीटीवरील प्रमुख आकर्षणे : द आर्चीज, कडक सिंग, रिबेल मून, मॅस्ट्रो होणार प्रवाहित
  3. 'भाजपाकडून निवडणूक लढवणार' बातमीचं कंगना रणौतनं केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details