मुंबई : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता राघव लॉरेन्स सध्या त्याच्या आगामी 'चंद्रमुखी २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांचा उत्साह वाढवत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'चंद्रमुखी २' मधील वेट्टयानच्या भूमिकेत राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. चित्रपटाचे पोस्टर आज म्हणजेच ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता रिलीज करण्यात आले आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. २००५ रोजी आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटाचा 'चंद्रमुखी २' सीक्वेल आहे. 'चंद्रमुखी' चित्रपटात यापूर्वी मेगास्टार रजनीकांत झळकले होते. पी वासू दिग्दर्शित, लॉरेन्स या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत दिसणार आहे.
राघव लॉरेन्सची दमदार शैली :चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर 'चंद्रमुखी २' चे पोस्टर शेअर करून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. कंगना रणौत आणि राघव लॉरेन्स स्टारर हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन निर्मित हा चित्रपट सप्टेंबरमध्ये तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.