महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रवाशांसह मुंबई विमानतळावर एरोब्रिजमध्ये तासंतास अडकली राधिका आपटे, वाचा काय घडलं - राधिका आपटेनं शेअर केला व्हिडिओ

Radhika Apte: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटे ही मुंबई विमातळावर एरोब्रिजमध्ये अडकली होती. विमातळावर गैरसोय झाल्यामुळं राधिका संतापली आहे.

Radhika Apte
राधिका आपटे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 5:10 PM IST

मुंबई - Radhika Apte: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटेनं तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या या पोस्टमुळे तिचे चाहतेही तणावात आहेत. राधिका काही प्रवाशांसह विमानतळाच्या एरोब्रिजमध्ये अडकली होती. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फ्लाइटमध्ये प्रवास करणारे सर्व लोक चिंतेत दिसत आहेत. याशिवाय या व्हिडिओतील प्रवाशांमध्ये काही वृद्धांचाही समावेश आहे. मुंबईत विमातळावर झालेल्या या गैरसोयीमुळं राधिका खूप संतापली आहे. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून तिनं आपला संताप व्यक्त केला आहे.

राधिका आपटेनं केली पोस्ट शेअर :या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''मला हे पोस्ट करावे लागत आहे. आज माझी फ्लाईट सकाळी 8.30 वाजता होती, आता 10.50 वाजले आहेत, अजून फ्लाईटमध्ये आम्ही चढलेलो नाही. आम्ही बोर्डात आहोत, सर्व लोकांना एअरोब्रिजमध्ये बसवून कुलूप लावण्यात आले आहे.'' पुढं तिनं लिहिलं, वृद्ध लोकांनाही एका तासापेक्षा जास्त काळ आत ठेवण्यात आले आहे. दरवाजे अजूनही उघडले नाहीत. कर्मचार्‍यांना कशाचीही कल्पना नाही आणि त्यांचा क्रू अद्यापही फ्लाईट चढलेला नाही. क्रू बदलला आहे, ते नवीन क्रूची वाट पाहत आहेत. हा क्रू कधी येणार याची काहीकल्पना नाही. इथे आम्ही किती वेळ बंद राहणार हे कोणालाच माहीत नाही. मी लपून एका महिला कर्मचार्‍यांशी बोलू शकले, जिनं मला सांगितलं की, कोणतीही समस्या नाही आणि कोणताही विलंब होणार नाही. आम्ही आतून बंद आहोत. त्यांनी आत्ताच सांगितलं की, आम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत येथे बंद राहणार आहोत.''

अन्न किंवा पाणी उपलब्ध नाही : राधिकानं पोस्टच्या शेवटी लिहिलं,''प्रत्येकजण आतमध्ये बंद आहे आणि येथे ना पाणी आहे ना वॉशरूम.'' यानंतर तिनं पोस्टवर खिल्ली उडवत लिहिलं , ''सवारीसाठी धन्यवाद.'' राधिका आपटेच्या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''इंडिगो एयरलाईन ही चांगली नाही, त्यांना प्रवास करणाऱ्या लोकांची काही काळजी नाही.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''राधिका तू ठिक आहे ना ? काळजी घे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''माझा देखील 'इंडिगोसोबतचा प्रवास हा खूप वाईट होता.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. 'सालार'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडाही गाठू शकले नाहीत साऊथ सुपरस्टार्सचे 6 चित्रपट
  2. शिवरायांचा 'छावा' चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर झालं रिलीज
  3. 'बिग बॉस 17'च्या 'वीकेंड का वार'मध्ये करण जोहरनं दिला अंकिता लोखंडेला पाठिंबा

ABOUT THE AUTHOR

...view details