मुंबई (महाराष्ट्र):आर माधवनने ( R Madhavan ) चा मुलगा वेदांतनेकोपनहेगन येथील डॅनिश ओपनमध्ये जलतरणात त्याचे सुवर्णपदक पटकावले. वेदांतचे हे जलतरणामधील दुसरे सुवर्णपदक आहे. कोपनहेगनमध्ये आपल्या मुलाने सुवर्णपदक ( R Madhavan son won gold medal Copenhagen ) जिंकल्याने आर माधवन अतिशय आनंदित झाला आहे. त्यांनी इंस्टाग्राम हँडलवर सत्कार समारंभातील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. आणि 51 वर्षीय अभिनेत्याने आपल्या मुलाचे प्रशिक्षक प्रदीप कुमार आणि भारतीय जलतरण महासंघाचे आभर मानले आहेत.
16 वर्षीय पुरुषांच्या 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. आणि 8:17.28 वाजता घड्याळ थांबवून 11:48 च्या वेळेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्याने स्थानिक जलतरणपटू अलेक्झांडर एल ब्योर्नला 0.10 ने मागे टाकले. @vedaantmadhavan साठी 800m मध्ये सुवर्णपदक आहे. यामुळे मी आनंदित आहे. प्रशिक्षक @bacpradeep सर @swimmingfederation.in @ansadxb आणि संपूर्ण टीमचे आभार, असेही आर माधवनने लिहिले.