मुंबई- साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द राइज'चा आवाज जगभरात अजूनही कायम आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील संवाद आणि गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द राइज' बद्दल आता एक मोठे अपडेट आले आहे. खरंतर या चित्रपटाची जादू आता रशियात चालणार आहे. होय, 'पुष्पा-द राइज' आता रशियात रिलीज होणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम रशियात आहे आणि तिथे त्यांनी रशियन भाषेत 'पुष्पा - द राइज' चित्रपटाचा ट्रेलरही लॉन्च केला आहे.
रशियात कधी रिलीज होणार चित्रपट - साऊथचा 'पुष्पा-द राइज' हा चित्रपट रशियात रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर होण्याचे एक कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध. पण आता परिस्थिती थोडी सामान्य झाल्यानंतर 'पुष्पा-द राइज'ची संपूर्ण टीम नुकतीच रशियाला पोहोचली आहे आणि तिथे चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार, संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद आणि निर्माते यांनी चित्रपटाचा आयकॉनिक डायलॉग 'मैं झुकेगा नही...वाला हावभाव' केला. तुम्हाला सांगतो, 'पुष्पा-द राइज' रशियामध्ये २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. 'पुष्पा - द राइज' 17 डिसेंबर 2021 रोजी भारतात रिलीज झाला.