महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pushpa 2 actors bus accident : पुष्पा-२ ची टीम एका रस्ता अपघाताची शिकार ; जखमी कलाकार रुग्णालयात दाखल - जखमी कलाकार रुग्णालयात दाखल

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटाची टीम बसने शूटिंगसाठी जात होती आणि वाटेत एका वाहनाला धडकल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोन कलाकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन

By

Published : May 31, 2023, 5:56 PM IST

मुंबई : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुष्पा-२ ची टीम एका रस्ता अपघाताची शिकार झाली आहे. बुधवारी तेलंगणाहून आंध्र प्रदेशकडे परतणाऱ्या पीटीसी बसला पुष्पा-२ च्या युनिटच्या बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर नरकेटपल्लीजवळ हा अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात युनिटचे दोन कलाकार जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात होत आहे, इथे चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण झाले आहे. श्रीकाकुलममध्ये मोठ्या प्रमाणात जंगले आणि शेतजमीन तसेच खडकाळ भूभाग आहे.

पुष्पा-२ चित्रपट : 'पुष्पा-द राइज' चित्रपटानंतर सुकुमारने 'पुष्पा-द रूल'ची कथा लिहिली आहे. या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात फहाद फासिल हा पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढल्या वर्षी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात, देवी श्री प्रसाद पुन्हा आपल्या संगीत आणि गाण्यांनी धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज आहे . मीडियानुसार, या चित्रपटात रणवीर सिंग एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतही दिसणार आहे, परंतु निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

पुष्पा-२ करणार बॉक्स ऑफिसवर कमाल : 'पुष्पा-द राइज' या चित्रपटाने फार बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. चित्रपटाच्या पहिल्या भागात ओम अंतवा, सामी-सामी आणि श्रीवल्ली या गाण्यांनी आधीच धमाका केला होता आणि आता देवी श्री प्रसाद चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आणखी धमाकेदार गाणी सादर करतील अशी अपेक्षा आहे.आता देखील पुष्पा-2 या चित्रपटाबद्दल फार चर्चा होताना दिसत आहे. कारण या चित्रपटात अल्लू अर्जुन हा अनोख्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्याबरोबर चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर फार चर्चा झाली 'पुष्पा-द राइज' प्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. KK 1st Death Anniversary : केके ची पहिली पुण्यतिथी, गायकाच्या मृत्यूमागील ५ कारणे
  2. Kabir Khans next directorial : कबीर खानच्या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार भुवन अरोरा
  3. Sonu Sood international school : सोनू सूद तर्फे बिहारमधील अनाथ मुलं जाणार इंटरनॅशनल स्कूलमध्ये!

ABOUT THE AUTHOR

...view details