मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान छोट्या-छोट्या हालचालींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. त्याच्या नियमित ASKSRK या सत्रामुळे तो चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनला आहे. शाहरुखने शनिवारी दिल्ली अपघात पीडित अंजली सिंगच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत रक्कम दान केल्यामुळे तो बातम्यांच्या मथळ्यात झळकला आहे. तेव्हापासून, शाहरुख सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे कारण चाहत्यांनी त्याच्या दातृत्वाच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
प्राऊड ऑफ शाहरुख खान ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि चाहते त्याच्या आवडत्या सुपरस्टारला त्याच्या दयाळूपणाबद्दल पाठिंबा आणि प्रेम देत आहेत. 12 डिसेंबर रोजी बेशरम रंग चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर शाहरुख आणि त्याचा आगामी चित्रपट पठाण याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु ट्विटरवरील शाहरुख खानचा अभिमानाचा ट्रेंड हे सिद्ध करतो की त्याचे राज्य अबाधित आहे. त्याचे चाहते त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत.
अंजलीचा वेदनेने मृत्यू - अंजली सिंह 31 डिसेंबरच्या रात्री मैत्रिण निधीसोबत घरी परत येत होती, परंतु ती घरी पोहोचू शकली नाही. कारण त्या रात्री अंजलीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे काहीसे घडले की, दिल्लीच्या कांजवाला रोडवर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अंजलीच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या वेदनादायक अपघातात, कारमध्ये अडकलेल्या अंजलीला अनेक किलोमीटर रस्त्यात ओढले गेले आणि तिला जीव गमवावा लागला. या अपघातात अंजलीची मैत्रिण निधी बचावली होती, मात्र अंजली त्या गाडीखाली अडकली. अंजलीचा वेदनेने मृत्यू झाला.