महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Project K on Time Square Billboard : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली 'प्रोजेक्ट के'ची जाहिरात, पाहा व्हिडिओ

प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची जाहिरात न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर येथील बिल बोर्डवर झळकली आहे. प्रोजेक्ट केच्या प्रमोशन कँपेनला २० जुलै पासून दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टपासून सुरू होणार आहे. यासाठीच ही जाहिरात होत असून प्रभासने याची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Project K on Time Square Billboard
'प्रोजेक्ट के'ची जाहिरात

By

Published : Jul 17, 2023, 7:40 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीने न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअर चौकातील बिल बोर्डवर आपली लोकप्रियता मिळवण्याचा नवीन ट्रेंड सुरू केला आहे. यापूर्वी महेश बाबूची मुलगी सिताराची एक ज्वेलरी जाहिरात या बिल बोर्डवर झळकली होती. आता याच जागेचा ताबा प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाने घेतला आहे.

अलिकडेच 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या रिलीज तारखेसह एक जाहिरात टाईम स्क्वेअर येथील बिलबोर्डवर झळकली आहे. प्रभासनेही याची एक व्हिडिओ क्लिप आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओत 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची ठळक अक्षकरात प्रदर्शनाची तारीख असलेली जाहिरात आपण पाहू शकतो. याला कॅप्शन देताना प्रभासने लिहिलंय, ' 'प्रोजेक्ट के' ने टाईम्स स्क्वेअरवर कब्जा केलाय, हे फार भारी आहे. रिबेल स्टार प्रभास.'

प्रोजेक्ट चित्रपटाच्या प्रमोशनची सुरूवात अमेरिकेतून २० जुलै पासून दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टपासून सुरू होणार आहे. या भव्य सोहळ्यात चित्रपटाचे शीर्षक 'प्रोजेक्ट के' का आहे याचा खुलासा केला जाणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा ट्रेलर व इतर प्रमोशनल साहित्याचेही लॉन्चिंग केले जाईल. या सोहळ्याला प्रभाससह चित्रपटातील इतर कलाकारही हजर राहतील. या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय कलाकारही हजर राहणार आहेत. कमल हासनदेखील या समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. या लॉन्चिंग सोहळ्याची जाहिरात आता न्यूयॉर्कच्या ऐतिहासिक टाईम्स चौकात सुरू झाली आहे.

आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटामध्ये बाहुबली स्टार प्रभास शिवाय कमल हासन, प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका असतील. दिग्गज भारतीय कलाकार एकाच चित्रपटातून झळकणारा 'प्रोजेक्ट के' हा एक भव्य चित्रपट असल्याचे मानले जाते.

वैजयंती मुव्हीज निर्मित 'प्रोजेक्ट के' नाग अश्वीन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्पटाच्या निर्मितीसाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले असल्याचे सांगितले जात आहे. आजवरच्या सर्वात बिग बजेट भारतीय चित्रपटापैकी हा एक चित्रपट असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा -

१.Ranveer Singh : रणवीर सिंग उर्फ रॉकी रंधावाचा शर्टलेस अवतार...

२.Aamir Ali And Shamita Shetty : शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवांवर आमिर अलीने मौन सोडले...

३.John Abraham : जॉन अब्राहमला ढोंगी म्हणत, नेटिझन्सनी फटकारले : वाचा काय आहे प्रकरण...

ABOUT THE AUTHOR

...view details