महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर... - poster

टॉलिवूड स्टार प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट-के' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चला तर पाहूया दीपिकाचा फर्स्ट लुक...

Project K
प्रोजेक्ट के

By

Published : Jul 18, 2023, 12:40 PM IST

मुंबई : आगामी सायन्स-फिक्शन चित्रपट 'प्रोजेक्ट के' च्या निर्मात्यांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा अधिकृत फर्स्ट लुक रिलीज केला. या चित्रपटाची निर्मीती करण्यासाठी ६०० कोटी रुपये लागले आहेत. त्यामुळे हा चित्रपट रूपेरी पडद्यावर किती कमाई करेल यावर सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, आता 'प्रोजेक्ट के'च्या पोस्टरमधील दीपिका पदुकोणच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर या पोस्टरमध्ये दीपिका सेपिया-टोन्ड अवतारात दिसत आहे. दीपिका पदुकोणच्या फर्स्ट लूकने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. दीपिकाचा हा लूक पाहून चित्रपटाच्या कथेत दडलेले रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत.

'प्रोजेक्ट के' : हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 'प्रोजेक्ट के' हा हिंदू देव विष्णूच्या भविष्यकालीन पुनर्कल्पनाबद्दल एक डायस्टोपियन विज्ञान कथा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विनने केले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान 'प्रोजेक्ट के' चित्रपट सॅन दिएगो कॉमिक-कॉनच्या आयकॉनिक एच हॉलमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'प्रोजेक्ट के'मध्ये मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी हे कलाकार दिसणार आहेत. वैजयंती मूव्हीज १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीचा भाग म्हणून चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी सांगेल. दरम्यान १२ जानेवारी २०२४ रोजी प्रोजेक्ट के' रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून प्रभास खूप अपेक्षा करत आहे. कारण यापूर्वी त्यांचा मेगा बजेट चित्रपट आदिपुरुष हा खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाला होता.

वर्क फ्रंट :दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती हृतिक रोशनसोबत आगामी एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. दीपिकाचा सिद्धार्थ आनंदसोबतचा हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. येत्या वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये करण सिंग ग्रोव्हरसोबत अक्षय ओबेरॉय देखील दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटातही तिचा खास डान्स नंबर आहे.

हेही वाचा :

  1. Aamir Ali And Shamita Shetty : शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवांवर आमिर अलीने मौन सोडले...
  2. Project K on Time Square Billboard : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली 'प्रोजेक्ट के'ची जाहिरात, पाहा व्हिडिओ
  3. John Abraham : जॉन अब्राहमला ढोंगी म्हणत, नेटिझन्सनी फटकारले : वाचा काय आहे प्रकरण...

ABOUT THE AUTHOR

...view details