मुंबई :प्रसिद्ध निर्माते मधू मंतेना आज 11 जून रोजी लेखिका आणि योग शिक्षिका इरा त्रिवेदीसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. शनिवारी इरा आणि मधू यांच्या मेहंदीच्या मेहंदी समारंभाला बी-टाउनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या दोन अभिनेत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तहे दोन अभिनेते म्हणजे अमिर खान आणि हृतिक रोशन.
या दोघांनी लक्ष वेधले : आमिर कार्यक्रमाच्या बाहेर उभ्या असलेल्या पॅप्ससमोर पोज देताना दिसला. या कार्यक्रमासाठी अमिर खानने कॅज्युअल पोशाख परिधान केला होता. अमिरने ऑलिव्ह ग्रीन टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्ससोबत काळ्या रंगाचे शूज घातले होते. पण अमिर खानचा हा लूक पूर्ण झाला तो त्याच्या रीडिंग चष्मामुळे. आमिर खानचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट गजनी चित्रपटाचा निर्माता म्हणून मधु यांनी काम केले होते. तर अभिनेता हृतिक रोशनही या मेहंदी कार्यक्रमात दिसला. हृतिकने पारंपारिक पोशाख परिधान केला होता. पांढऱ्या कुर्ता आणि पायजमा घातला होता, कर्तावर त्याने बरगंडी रंगाचा नेहरू कोट घातला होता. तो पापाराझींसमोर पोज देताना दिसला. दरम्यान या पोशाखत हृतिक खूपच सुंदर दिसत होता.
राजकुमार राव वाटला राजुकमार : दरम्यान या दोघांच्या व्यतिरिक्त अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा देखील या कार्यक्रमात आले होते. दोघांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता. हे कपल सिल्व्हर आउटफिट्समध्ये ट्विनिंग करताना दिसले. पत्रलेखाने परिधान केलेल्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती. कारण तिने चांदीचा नक्षीदार सूट घातला होता. तर तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले. तिने भारदस्त मेकअप केला होता. दुसरीकडे राजकुमार रावने चंदेरी रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता.
वर आणि वधूचा फोटोशुट : निर्माते मधु मंतेना आणि इरा त्रिवेदीही शटरबग्ससमोर पोज देताना दिसले. मेहंदीच्या समारंभासाठी मंतेनाने ऑफ-व्हाइट कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर इराने गुलाबी लेहेंगा परिधान केला होता. इराने तिचे केस मोकळे ठेवले होते. भारदस्त दागिन्यांसह तिचा लूक खूप सुपर वाटत होता. हे दोघेही आज इस्कॉन मंदिरात लग्न करतील. लग्नानंतर ते रिसेप्शन देणार आहेत. दरम्यान मधूचे हे दुसरे लग्न असून त्याने यापूर्वी फॅशन डिझायनरसोबत लग्न केले होते.
हेही वाचा -
- Varun Tej-Lavanya Tripathi engagement : वरुण तेज-लावण्य त्रिपाठी यांचा हैदराबादमध्ये झाला साखरपुडा
- Parineet and Raghav wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या ठिकाणी करणार आहे लग्न जाणून घ्या...