मुंबई - Jee Le Zaraa:फरहान अख्तरच्या दिग्दर्शित 'जी ले जरा' मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटसाठी आतुर होते. 'जी ले जरा' चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार तारखेच्या मुद्द्यांमुळे चित्रपट तारीख पुढे ढकलण्यात आला आहे. फरहान अख्तरनं देखील याबाबत आता सांगितलं आहे. फरहान अख्तरनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रियांका चोप्रासोबत डेटची समस्या असल्यानं 'जी ले जरा' हा चित्रपट पुढे ढकण्यात आला होता, मात्र आता असं देखील म्हटलं जात आहे की, 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका नसेल.
प्रियंका चोप्रानं 'जी ले जरा' करायला का दिला नकार ? :मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट पुढे ढकलण्याचं कारण प्रियांका चोप्रा आहे. तिला 'जी ले जरा'ची स्क्रिप्ट आवडली नाही, त्यामुळे तिनं चित्रपट करण्यास नकार दिला. प्रियांका तिची बहीण परिणीती चोप्राच्या लग्नासाठी भारतात येणार होती आणि त्यानंतर ती हा चित्रपटही साइन करणार होती, परंतु काही मतभेदांमुळे तिनं या चित्रपटासाठी नकार दिला आहे. प्रियांकानं नकार दिल्यानंतर फरहान अख्तरला हा चित्रपट बनवण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाची कहाणी तो नव्या पद्धतीनं सादर करणार आहे. या चित्रपटाची कहाणी थोडी जुनी झाली आहे, त्यामुळे चित्रपटाची कहाणी रंजक बनवण्याचे काम निर्माते करत आहेत. हा चित्रपट फ्लोरवर येण्यासाठी आणखी दोन वर्षे लागू शकतात.