महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियंका चोप्राने पती निकला दिली 'फादर्स डे'चे अनोखी भेट!! - मालती निक जोनास

प्रियांका चोप्राने फादर्स डेच्या निमित्ताने तिचा नवरा निक जोनास आणि त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला.प्रियंकाने या वर्षी मुलीचा पहिला फादर्स डे साजरा करताना बाप लेक जोडीला जुळणारे स्नीकर्स देखील भेट दिले.

प्रियांका चोप्राने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या
प्रियांका चोप्राने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या

By

Published : Jun 20, 2022, 12:23 PM IST

कॅलिफोर्निया (यूएस)- ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास आणि पती निक जोनास यांच्या सुंदर फोटोसह फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. फोटोत निक जोनास आपली मुलगी मालतीला लाल रंगाच्या वन-पीस ड्रेसमध्ये छान हेअरबँडसह धरून ठेवताना दिसत आहे.

फोटोमध्ये निक जोनास आणि मालती मॅचिंग शूज घातलेले दिसत आहेत. छोट्या मालतीच्या शूजवर MM आद्याक्षरे लिहिलेली आहेत आणि निकच्या शूजवर 'MM's Dad' असे लिहिलेले आहे. प्रियंकाने फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दाखवण्याचे टाळले आहे.

हा सुंदर फोटो शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमधून आपले पतीवरील प्रेम व्यक्त केले आहे. फोटोत बाप लेकीची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. निक जोनासनेही पत्नीच्या या पोस्टवर आपली छान प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी कमेंट सेक्शन हृदयाच्या इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत. "या फोटोने माझा दिवस बनवला" असे एका युजरने फोटोवर कमेंट करताना लिहिले.

कामाच्या आघाडीवर, प्रियांका तिच्या थ्रिलर वेब शो सिटाडेलच्या शूटिंगमध्ये गुंतलेली आहे. रुसो ब्रदर्सद्वारे या वेब सिरीजची निर्मिती केली जात आहे. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनातील आगामी 'जी ले जरा' या चित्रपटातही प्रियंका दिसणार आहे. या रोड ट्रिप ड्रामामध्ये कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसतील.

हेही वाचा -Shabaash Mithu Trailer: अजिंक्य विजेती मिताली राजची विजय गाथा

ABOUT THE AUTHOR

...view details