मुंबई - Don 3 Update:फरहान अख्तरनं नुकतीच 'डॉन 3'ची घोषणा केली आहे. 'डॉन 3'मध्ये शाहरुख खान दिसणार नाही. या चित्रपटामध्ये किंग खानच्या ठिकाणी रणवीर सिंग दिसणार आहे. शाहरुख खान डॉन फ्रँचायझीमधून बाहेर पडला आहे. काही दिवसापूर्वी 'डॉन 3'च्या निर्मात्यांनी खुलासा केला होता की, रणवीर सिंग चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची एक छोटीशी झलकही सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे की बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील डॉन फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करणार आहे.
'डॉन 3'मध्ये दिसेल प्रियांका चोप्रा ? :सध्या असा दावा केला जात आहे की, प्रियांका या चित्रपटाबाबत नुकतीच फरहान अख्तरला भेटली. त्यानंतर त्यांच्यात 'डॉन 3' बद्दल चर्चा झाली. प्रियांकानेही या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिलं असल्याचं सध्या समजत आहे. याआधी 'डॉन 3'च्या लीडसाठी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनची नावे समोर आली होती. आता पुन्हा एकदा प्रियांकाला पोलीस अधिकाऱ्याच्या स्टाईलमध्ये पाहायला प्रेक्षकांना मिळेल. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, प्रियांकाच्या बाजूनं ग्रीन सिग्नल दिसत असल्याचं समजत आहे.