मुंबई - Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रा जोनासनं पती गायक निक जोनाससाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निकला शुभेच्छा देत प्रियांका काही सुंदर फोटो इंस्टाग्राम शेअर केली आहेत. प्रियांकानं पहिला फोटो सेल्फीमधला पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती निकला किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती निकसोबत पोझ देत फोटो काढत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये निक हा गोल्फ खेळताना दिसत आहे. चौथ्या फोटोमध्ये ती ही उभी आहे. पाचव्या फोटोमध्ये निक हा मुलगी मालतीला खायला घालताना दिसत आहे. प्रियांकानं शेअर केलेले हे फोटो खूप खास आहेत.
प्रियांकानं शेअर केली पोस्ट :प्रियांकानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुझ्यासोबत आनंद साजरा करणं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. तुम्ही मला अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त केलेत जे मला शक्य वाटत नव्हत्या. मला कधीही माहित नसलेली शांतता दाखवली,आय लव्ह यू बर्थडे बॉय, मला आशा आहे की तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा बेब'. असं प्रियांकानं लिहलंय. प्रियांका चोप्राचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करत निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहलं 'खूप खास निक आणि प्रियांकाची जोडी आहे' दुसऱ्या यूजरनं लिहलं 'निक चांगला पिता आणि पती आहे'. आणखी एका यूजरनं लिहलं. 'निक आणि मालती खूप सुंदर दिसत आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.