मुंबई :अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी अलीकडेच त्यांची मुलगी मालती मेरीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. नुकतेच प्रियांका आणि निकने सरोगसीचा पर्याय का निवडला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री प्रियांका चोप्राने सरोगसीबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली, मला वैद्यकीय गुंतागुंतीची समस्या असल्यामुळे हा पर्याय निवडावा लागला. आमचे बाळ 27 व्या आठवड्यात जन्माला आले आहे. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच बाळाचा जन्म झाल्याने बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. तसेच आणखी काही दिवस बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
Priyanka Chopra on Surrogacy : देसी गर्ल प्रियांकाने सरोगसीबद्दल केला खुलासा, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर - birth of daughter Malti Marie
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या देसी गर्लने काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची गुडन्यूज दिली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी अलीकडेच त्यांची मुलगी मालती मेरीचा पहिला वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सरोगसीबद्दल खुलासा केला आहे.
फर्टिलिटीबाबत समस्या : सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर अनेकांनी टीका केली. अभिनेत्री प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण वाढत्या वयामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नसल्याचे ट्रोलरने म्हटले होते. तसेच त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडल्याचेही म्हटले होते. ती म्हणाली, तुम्ही मला ओळखत नाही. मी काय सहन केले आहे हे तुम्हाला माहीत नाही. प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली की, जेव्हा लोक तिच्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा ते वेदनादायक असते. मला असे वाटते की, तिला यापासून दूर ठेवा.
व्यस्त कारकीर्दीला जबाबदार धरले :देसी गर्लचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या आयुष्यातले खास क्षण सोशल मीडियावर टाकत असते. प्रियांकाने सांगितले की, जेव्हा तिच्या मुलीचा प्रश्न येतो तेव्हा ती एक खासगी व्यक्ती आहे. प्रियांका आणि निक यांनी सरोगसीचा मार्ग का निवडला याच्या कारणांबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकांनी तिच्या व्यस्त कारकीर्दीला जबाबदार धरले आहे. प्रियांका म्हणाली की कोणालाही कारणे तयार करण्याचा अधिकार नाही. ती म्हणाली, तुम्ही मला ओळखत नाही. मी काय सहन केले आहे हे तुम्हाला माहीत नाही. प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली की, जेव्हा लोक तिच्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा ते वेदनादायक असते. मला असे वाटते की, तिला यापासून दूर ठेवा. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी जानेवारी 2022 मध्ये मालती मेरीचे स्वागत केले. त्यांनी तिला मदर्स डेच्या दिवशी घरी आणले आणि तेव्हापासून हे जोडपे तिचे फोटो ऑनलाइन शेअर न करण्याबाबत अत्यंत काळजी घेत आहेत.