मुंबई- प्रियांका चोप्रा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रियांका चोप्रा या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे एका मुलीची आई बनली आणि तेव्हापासून मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबतचे फोटो शेअर करत आहे. मात्र, आतापर्यंत अभिनेत्रीने आपली मुलगी मालतीचा चेहरा पूर्णपणे दाखवलेला नाही. अभिनेत्रीने रविवारी पुन्हा एकदा तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्येही प्रियांकाने मुलगी मालतीचा चेहरा लपवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले की, 'प्रेमासारखे दुसरे काही नाही'. या फोटोत प्रियांकाने हिरव्या रंगाचा शॉर्ट्सवर पांढरा शर्ट घातला आहे आणि तिची मुलगी तिच्या मांडीवर बसलेली आहे. हा एक सेल्फी फोटो आहे.
दुसऱ्या फोटोत मालतीचे पाय प्रियांका चोप्राच्या तोंडावर आहेत आणि ती हसत आहे. मालतीचे पाय खूप सुंदर दिसत आहेत. आता चाहते आणि सेलिब्रिटी या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. प्रियांकाच्या या फोटोंच्या कॅप्शनवर अभिनेत्री दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे.