मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर तिची उपस्थिती तितकीच नियमीत आहे. प्रियांका सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या क्षणाचे अपडेट्स देत असते. ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त असली तरी चाहत्यांशी संपर्क साधण्यास विसरत नाही. आता प्रियंका चोप्राने तिचे दिवंगत वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
प्रियांका चोप्राने 10 तासात तीन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये ती तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिसऱ्या पोस्टमध्ये तिने एक इंग्रजी म्हण शेअर केली आहे.