मुंबई- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा नुकतीच तीन वर्षांनंतर अमेरिकेतून तिच्या माहेरी आली हेती. येथे अभिनेत्री 10 दिवस मुक्कामी राहिली. यादरम्यान अभिनेत्रीने देसी फूड चाखले तसेच तिचे कामही पूर्ण केले. याशिवाय प्रियांका चोप्राने उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊलाही भेट दिली, जिथे ती युनिसेफच्या अंतर्गत एका मिशनवर गेली होती. आता प्रियांका चोप्रा तिच्या सासरच्या अमेरिकेतील घरी परतली आहे आणि तिथून तिने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
प्रियांकाने फॅमिली फोटो शेअर केला - प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन फोटोमध्ये ती पती निक जोनाससोबत जमिनीवर पडली आहे. प्रियांकाने मुलगी मालतीला हातात धरले आहे आणि निक पत्नी आणि मुलीकडे पाहून हसत आहे. हा सुंदर फॅमिली फोटो शेअर करत प्रियांकाने 'होम' असे लिहिले आहे. म्हणजेच, ती लॉस एंजेलिसमध्ये तिच्या घरी (सासरी) आहे.