मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा पती निक जोनाससोबत चुंबन शेअर करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 19 जुलै रोजी प्रियांकाच्या 40 व्या वाढदिवसाच्या पार्टीचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी प्रियांकाने मेक्सिकोमध्ये तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. काही दिवसांनंतर, एका फॅन पेजद्वारे शेअर केलेल्या पीसी आणि निकच्या व्हिडिओ क्लिपने आता इंस्टाग्रामवर तुफान निर्माण केले आहे.
प्रियांका आणि निक त्यांच्या खासगी आयुष्यातील सुंदर क्षण साजरे करण्यासाठी ओळखले जातात. हे जोडपे सार्वजनिकरित्या आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यास कधीच मागे हटत नाही आणि त्यांच्या प्रेमळ क्षणांची अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर येत राहतात. प्रियांका आणि निकचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निक चुंबन घेताना दिसत आहेत. जांभळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसणारी, प्रियंका तिच्या पतीचे चुंबन घेताना आणि समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी दिसली. हातात शॉट धरून टेबलावर बसलेली, प्रियंका निकच्या ओठांवर चुंबन घेते. व्हिडिओमध्ये प्रियांकाची आई मधु चोप्रासोबत निक डान्स करताना दिसत आहे.