हैदराबाद: ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा इटलीतील व्हेनिस येथे कामाच्या एका छोट्या प्रवासानंतर अमेरिकेत परतली आहे. तिने या प्रवासादरम्यान मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची खूप आठवण केली. प्रियांकाची तिच्या मुलीसोबत पुन्हा भेट होताच तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मालतीसोबत खेळतांना दिसत आहे. तिने हा फोटो इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला होता. या फोटोमध्ये मालतीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर लाल रंगाचे फुले आहे. तसेच प्रियंकाने साधा राखाडी रंगाचा लाउंज आउटफिट घातला आहे. मालतीला, इतर मुलांप्रमाणेच, खेळण्यांमध्ये पुठ्ठ्याच्या खोक्याकडे बघत आहे.
प्रियांका चोप्राने शेअर केला सुंदर फोटो : जेव्हा प्रियंका कामासाठी बाहेर गेली होती तेव्हा मालती प्रियांकाच्या आईजवळ म्हणजेच डॉ. मधु चोप्रासोबत होती. प्रियंकाने मंगळवारची रात्र व्हेनिसमध्ये घालवली होती. अॅनी हॅथवे आणि झेंडया यांच्यासोबत बल्गारी कार्यक्रमात तिने सहभाग घेतला होता. अलीकडेच प्रियांकाने एका मुलाखतीत तिने मालतीबद्दल सांगितले. 'माझी मुलगी सध्या माझ्या आईसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे, कदाचित तिच्या आयुष्यातील हा वेळ चांगला असेल आणि ती रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खात असेल,असे तिने सांगितले. अलीकडे तिने मदर्स डे वर, तिने आई मधु आणि सासू डेनिसला समर्पित एक पोस्ट टाकली होती. यामध्ये तिने सासू डेनिसचे आणि आई मधुचे आभार मानले आहे. प्रियांका आणि निक जोनास 2018 मध्ये भारतात विवाहबंधनात अडकले होते. या जोडप्याने गेल्या वर्षी त्यांची पहिली मुलगी मालती मेरीचे स्वागत केले. जानेवारीमध्ये माती ही एक वर्षाची झाली.