मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिची आई मधु चोप्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर आईच्या नावाने एक सुंदर पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांका चोप्राने तिच्या आईचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये प्रियांकाने तिच्या आईसाठी एक अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट लिहिली आहे. यासोबतच प्रियांकाचा पती निक जोनासने एका पोस्टद्वारे सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आजीच्या मांडीवर दिसली मालती चोप्रा जोनास- प्रियंका चोप्राने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आणि मधु चोप्रा दिसत आहेत. तसेच नात मालती चोप्रा जोनास मधु चोप्राच्या मांडीवर विश्रांती घेत आहे. या फोटोवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.