मुंबई :ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवर गायक पती निक जोनासच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. निकने त्याच्या 'द गुड हाफ' या चित्रपटाबद्दल शेअर केले आहे, जो ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. या पोस्टमध्ये निक हा चित्रपटातील इतर कलाकारांसोबत दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना, निकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या नवीन चित्रपट 'द गुड हाफ' चा वर्ल्ड प्रीमियर ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये 8 जून रोजी स्क्रीनिंग होईल. या अविश्वसनीय कलाकारांसोबत येण्यास उत्सुक आहे! त्यानंतर निकने त्याच्या चित्रपटातील कलाकारांना पोस्टमध्ये टॅग केली आहे. प्रियांकाने पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले, 'गो'(चला) त्यानंतर तिने पोस्टवर फायर आणि क्लॅप इमोजी दिले.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया : निकच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी फार कमेंट केली आहे. चाहत्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी उत्साह दाखलिला आहे. एका चाहत्याने लिहले, 'छान आहे, निक. हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तर दुसर्या एका चाहत्याने लिहले, 'मुंबई नाईट्स पॉपकॉर्नसह हा चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे.' तर आणखी एकाने लिहिले, 'हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे, निकचा तुझा अभिमान आहे.' तसेच चाहत्यांनी कमेंट विभागात लाल हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहे.